Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २६ नोव्हेंबर, २०२५

मुंबईमध्ये ११ लाख दुबार मतदार -- अनेक ठिकाणी ४ लाख मतदारांची नावे--- पालिका प्रशासनाकडून दुसरा

 संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:--  9730 867 448



दुबार मतदार : मुंबई मतदार यादीतील दुबार नावांवरून राजकीय पक्षांनी आरोपांच्या फैरी झाडलेल्या असताना आता मुंबई महापालिका प्रशासनानेही याबाबत कबुली दिली आहे. एकूण २२७ प्रभागांमध्ये ११ लाख दुबार नावे असल्याचे आढळून आले आहे. तर त्यापैकी काही नावे ही दुबार, तिबार नाहीत तर शंभर वेळाही आहेत. अशी ४ लाख नावे अनेक वेळा अनेक प्रभागांमध्ये असल्याचे आढळून आले आहे. सर्वाधिक दुबार नावे ही वरळी विधानसभा मतदारसंघातील एका प्रभागात असल्याचे आढळून आले आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी २० नोव्हेंबरला मतदार यादी जाहीर करण्यात आली. प्रारूप मतदार यादीवर २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती व सूचना नोंदवण्यात येणार आहेत. तर ५ डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. या वेळच्या मतदार यादीमध्ये दुबार नावे आणि वगळलेली नावे चिन्हांकित करण्यात आली आहेत.

निवडणूक विभागाकडून गोपनीयता

मुंबई महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांना कोणतीच माहिती दिली जात नव्हती. त्याबद्दल मुंबई महापालिकेच्या वार्ताहर संघाने आक्षेप नोंदवल्यानंतर निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. राजकीय पक्ष हे मतदार यादीवर आरोप करीत असताना प्रशासनाने मात्र याबाबत गोपनीयता पाळली होती. अखेर मंगळवारी याबाबत सगळी आकडेवारी प्रशासनाला सादर करावी लागली.

मतदाराकडून हमीपत्र

दुबार नाव असलेल्या मतदारांकडून मतदान कुठे करणार याचे हमीपत्र घेण्यात येणार आहे. ही दुबार नावे मतदार यादीतून काढून टाकण्याचा सर्वस्वी अधिकार निवडणूक आयोगाचा असल्याचेही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. विरोधकांनी दुबार नावांचा मुद्दा उपस्थित केला असला तरी मतदार यादीत काही नावे अनेक वेळा अनेक ठिकाणी असल्याची गंभीर बाबही यानिमित्ताने आढळून आली आहे. अनेक मतदारांची नावे मुंबईतील विविध प्रभागांमधील मतदार यादीमध्ये आहेत. अशा मतदारांची संख्या ४ लाख ३३ हजार असल्याचे पालिकेच्या निवडणूक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

एकूण मतदार ….१ कोटी ३ लाख ४४ हजार ३१५

पुरुष मतदार ….५५ लाख १६ हजार ७०७

महिला मतदार ….४८ लाख २६ हजार ५०९

तृतीयपंथी मतदार ….१०९९

दुबार नावे ….११ लाख १ हजार ५०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा