Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २६ नोव्हेंबर, २०२५

आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ स्पर्धेमध्ये सहकार महर्षी कारखान्याच्या शेतकी अधिकारी यांचा प्रथम क्रमांक

 अकलूज-- प्रतिनिधी 

    केदार लोहकरे 

टाइम्स 45 न्यूज मराठी 


महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ मर्यादित मुंबई यांचे वतीने " आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ " निमित्त सहकारी साखर कारखान्याचे कामगारांकरिता राज्यस्तरीय विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेकरिता सहकार महर्षी शंकरराव मोहिते- पाटील सहकारी साखर कारखान्याचे शेतकी अधिकारी समाधान उर्फ रविराज शिवाजी चव्हाण यांनी सहकारातून समृद्धी हे पोस्टर सादर केले होते.सदरच्या पोस्टर्रला या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळाला असून यामुळे शेतकी अधिकारी यांनी सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याची शान वाढली आहे.

            या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा सीएसीपीचे अध्यक्ष विजय पॉल शर्मा,राष्ट्रीय सहकारी संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील,साखर संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील यांचे शुभहस्ते पुणे येथे संपन्न झाला. यावेळी को-जन असोसिएशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर,साखर आयुक्त डॉ. संजय कोलते,लेखक व अर्थतज्ञ अच्युत गोडबोले,व्हिएसआयचे डायरेक्टर जनरल संभाजी कडू-पाटील,महेश तिटकारे,साखर संघाचे उपाध्यक्ष प्रताप ओहोळ व साखर संघ कार्यकारी संचालक संजय खताळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

           या अनुषंगाने शेतकी रविराज चव्हाण यांचे कारखान्याचे मार्गदर्शक संचालक,महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील,व्हाईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख,संचालिका कु.स्वरूपाराणी जयसिंह मोहिते- पाटील तसेच संचालक व खाते प्रमुख यांनी अभिनंदन केले.या विविध स्पर्धेमध्ये सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचे इतर १० कर्मचारी सहभागी झाले होते त्यांनाही निवड श्रेणीमध्ये मान मिळाला आहे.शेतकी अधिकारी समाधान उर्फ रविराज चव्हाण यांना वैयक्तिक मिळालेल्या बक्षिसामुळे

कारखाना कामगार,ऊस उत्पादक सभासद व तोडणी वाहतूकदार तसेच हितचिंतक यांचेमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा