अकलूज प्रतिनिधी
केदार लोहकरे
टाइम्स 45 न्यूज मराठी
शंकरनगर-अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील कारखान्याच्या संचालिका कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांची दि डिस्टिलर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबईच्या संचालक पदी निवड झालेली आहे.यापूर्वी त्यांनी जिल्हा परिषद सदस्य तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठच्या सिनेट संचालक म्हणून काम पाहिले आहे.
सध्या त्या शैक्षणिक, सहकार,सामाजिक व राजकीय तसेच विविध विश्वस्त संस्थाच्या माध्यमातून नेतृत्व केले असून स्वतःच्या कार्याचा वेगळा असा उत्तम ठसा उमठविलेला आहे. सहकार महर्षी कै.काकासाहेब व आक्कासाहेब यांच्या आशीर्वादाने व विजयसिंह मोहिते-पाटील, माजी उपमुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य व कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांच्या कुशल नेतृत्वाचा व मार्गदर्शनाचा लाभ होवून त्यांना विविध क्षेत्रांमध्ये काम करण्याच्या वाटा निर्माण होत आहेत.
साखर उद्योगांमधील डिस्टिलरी व्यवसाय निगडित राज्याच्या असोसिएशनमध्ये संचालक म्हणून निवड झाल्यामुळे या उद्योगातील अडीअडचणी व त्याची सोडवणूक तसेच शासकीय स्तरावरील विविध मान्यता व धोरण ठरविण्यामध्ये त्यांना सहभागी होण्याची संधी प्राप्त झालेली आहे. त्यांच्या पुढील कार्यासाठी आणखी एक संधीच दालन खुले झाले आहे. तसेच राज्यस्तरीय या असोसिएशन मध्ये सहकार महर्षी कारखान्याला एक प्रतिनिधित्व मिळालेले आहे.या निवडीने कारखाना व्यवस्थापनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्याचे औचित्य साधून कारखान्याच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये कारखान्याचे चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील व व्हाईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख तसेच संचालक मंडळाच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार संचालिका सौ.सुजाता शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी सत्कारास उत्तर देताना स्वरूपाराणी मोहिते-पाटील म्हणाल्या की,मला ज्या ज्या क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध झाली त्या त्या ठिकाणी मी माझ्या कामातून योगदान दिले आहे याबद्दल मी खूप समाधानी व आनंदी आहे.या मिळालेल्या संधीलाही मी न्याय देण्याचा प्रयत्न करेन.माझ्या निवडीच्या निमित्ताने माझा जो सन्मान केला केलेल्या त्याबद्दल मी आपणा सर्वांना धन्यवाद देते. याप्रसंगी कारखान्याचे संचालक लक्ष्मण शिंदे,सतीश शेंडगे, नानासाहेब मुंडफणे,ॲड. विजयकुमार पवार,रावसाहेब मगर, संग्रामसिंह जहागिरदार,रामचंद्र सिद,विराज निंबाळकर,रावसाहेब पराडे,महादेव क्षिरसागर,अमरदीप काळकुटे,भिमराव काळे,गोविंद पवार,डॉ.सुभाष कटके,रामचंद्र ठवरे,तज्ञ संचालक, ॲड.प्रकाशराव पाटील रामचंद्रराव सावंत-पाटील, कार्यलक्षी संचालक रणजीत रणनवरे शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपती मल्टिमेडिया लेजर शो कमिटी संचालक बाळासाहेब माने-देशमुख,दत्तात्रय चव्हाण, राजेंद्र भोसले,धनंजय सावंत नामदेव चव्हाण,धनंजय दुपडे,अनिलराव कोकाटे,श्रीकांत बोडके,सौ.हर्षाली निंबाळकर तसेच अधिकारी उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा