*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147*
----- : सराटी (ता.इंदापूर) येथे उपजिल्हा रुग्णालय इंदापूर व ग्रामीण रुग्णालय बावडा यांच्या सहकायनि मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. सदर शिबिरात रक्तदाब, शुगर तपासणी, हृदय, ईसीजी तपासणी, रक्त तपासणी, गरोदर माता तपासणी आदींच्या तपासण्या व औषधोपचार मोफत करण्यात आले. तसेच डोळे तपासणी करून अल्प दरात चष्मे वाटपही करण्यात आले. त्याचप्रमाणे आयुष्यमान भारत कार्डची नोंदणी करण्यात आली. शिबिराचा ३३५ नागरिकांनी लाभ घेतला.
शिबिर यशस्वीतेसाठी पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आण्णासाहेब कोकाटे व अजितदादा पवार विचारमंचचे कार्यकर्त, आशासेविका, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका यांनी सहकार्य केले. यावेळी बाळासाहेब कोकाटे, समिर तांबोळी, तानाजी कोकाटे आदि मान्यवर उपस्थित होते.
सदर शिबीरात रक्तगट तपासणी १४६, रक्त तपासणी ४६, रक्तदाब तपासणी १०२, शुगर तपासणी ७६, डोळे तपासणी ८१, ईसीजी ३०, गरोदर माता ९, आयुष्मान कार्ड ७६ असे ३३५ तपासणी करण्यात आली.
फोटो - सराटी येथे उपजिल्हा रुग्णालय इंदापूर व ग्रामीण रुग्णालय बावडा यांच्या सहकायनि मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.
-------------------------------------------------------------------------







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा