उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
करमाळा
स्वच्छ व पारदर्शी कारभार चालविण्यासाठी मला एक वेळ नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी संधी द्यावी अशी विनंती सावंत गटाच्या करमाळा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ मोहिनी संजय सावंत यांनी करमाळा शहरातील मतदारांना केले आहे
सौ सावंत याबाबत बोलताना पुढे म्हणाल्या की सावंत गटाने गेली कित्येक वर्षापासून करमाळा शहरातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडवले असून आजही शहरवासीयांच्या समस्या सोडवीत आहे सावंत गट सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर असून शासकीय कार्यालयातील अनेक पीडित, गोरगरीब गरजू नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्न सावंत घटाने मार्गी लावल्या आहेत मी तुमची लेक आहे असे समजून मला करमाळा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी एक वेळ निवडून देऊन पहावे मी तुम्ही दिलेल्या मतरूपी शिदोरी मधून भविष्यात करमाळा शहरातील नागरिकांच्या अडचणी सोडविल आपण मला केलेल्या मतदानाचे मी भविष्यात निश्चित सोने करून दाखवीन भविष्यात करमाळा स्वच्छ व सुंदर नियमित पाणीपुरवठा शहरातील रस्ते डांबरीकरण करणे अशा मूलभूत गरजा मी भविष्यात सोडविण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन असे मत सावंत गटाच्या करमाळा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ मोहिनी सावंत यांनी यावेळी बोलताना सांगितले
करमाळा नगरपालिकेच्या येत्या दोन डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी मला करमाळा शहरातील नागरिकांनी आपली लेक, बहीण, आई असे समजून मला मतरूपी मतदान माझ्या पारड्यात टाकावे व मला प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे भावनिक आवाहन सौ सावंत यांनी शेवटी बोलताना केले




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा