Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २२ नोव्हेंबर, २०२५

पळसदेव येथील शालेय क्रीडा स्पर्धेत साडेतीनशे विद्यार्थ्यांचा सहभाग

 *कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147*



----- पळसदेव तालुका इंदापूर येथे न्हावी केंद्रातील विविध कला व सांस्कृतिक स्पर्धा पार पडली यामध्ये न्हावी केंद्रातील १४ जिल्हा परिषद शाळातील विध्यार्थ्यानी सहभाग घेतला . यामध्ये एकूण  १८ क्रीडा प्रकारात एकूण ३२५ विध्यार्थी सहभागी झाले असल्याची माहिती केंद्र समन्वयक  भारत बांडे यांनी दिली

          पुणे जिल्हा परिषदेच्या सूचनेनुसार यशवंतराव चव्हाण कला ,क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा सन  २०२५-२६  दिनांक १८ नोव्हेंबर ते ३१ डिसेबर या दरम्यान पार पडण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या .त्यानुसार केंद्र स्तर १८ ते २० नोव्हेंबर , बिट स्तर २५ ते २७ नोव्हेंबर ,तालुका स्तर ४ ते ६ डिसेबर ,जिल्हा स्तरावरील ३० ते ३१ डिसेबर या दरम्यान पार पडणार आहेत . यामध्ये एकूण २४ क्रीडा प्रकारचा समावेश करण्यात आला आहेत . यामध्ये लोकनृत्य , कबड्डी ,खोखो ,भजन ,लेझीम ,धावणे ,लांब उडी , उंच उडी ,गोळा फेक , बुद्धिबळ ,प्रश्नमंजुषा ,वेशभूषा ,बडबड गीते , लिंबू चमचा ,गायन ,वैयक्तिक गायन इत्यादी आशा २४ क्रीडा प्रकारचा समावेश करण्यात आला आहे .




      जिल्हा परिषदेच्या सूचनेनुसार न्हावी केंद्र स्तरीय  स्पधेचे आयोजन जिल्हा परिषद शाळा पळसदेव येथे करण्यात आले होते . या वेळी न्हावी केंद्रातील पळसदेव ,माळेवाडी ,शेलारपट्टा ,मधलामळा,न्हावी ,बांडेवाडी ,शिंदेवस्ती , भावडी , येडेवस्ती ,करगळ मरकड वस्ती ,देवकतेवस्ती ,बोराटवाडी ,चांडगाव , डोंबाळवाडी इत्यादी शाळातील सुमारे ३२५ विध्यार्थीनी एकूण १८ क्रीडा प्रकारात सहभाग नोंदवला . या वेळी विजेत्या विध्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले . या वेळी विजेते विध्यार्थी भिगवण बिट पातळीवर खेळणार आहेत .

      या वेळी केंद्र समन्वयक भारत बांडे यांनी बोलताना संघितले कि ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना लहान वयातच खेळाची आवड निर्माण व्हावी , त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी आसा स्पर्धा जिल्हा परिषदेच्या वतीने दर वर्षी आयोजित केल्या जात असल्याचं मत व्यक्त केला . यापुढे अधिकाधिक विध्यार्थी खेळात सहभागी होतील यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा देखील व्यक्त केली . या वेळी शेलारपट्टा, बांडेवाडी, माळेवाडी , पळसदेव या शाळेतील विद्यार्थ्यांनी खेळाचे विशेष सादरीकरण केले. 

    या वेळी  न्हावी केंद्र प्रमुख शशिकांत गावडे ,कळस केंद्र प्रमुख बाळासाहेब डांगे केंद्र समन्वयक  भारत बांडे ,पवार चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रामदास पवार, चेतन बनसुडे ,जयदीप शिंदे , जालिंदर गरड उपस्तित होते स्पर्धा यशस्वी कारण्यासाठी संजय लोहार , बापू आदलिंग ,संजय जाधव यांनी सहकार्य केले . या वेळी पवार चॅरिटेबल ट्रस्ट  च्या वतीने खेळाडूंना ६० डजन केळी वाटप करण्यात आले .

फोटो - लोकनृत्याचे सादरीकरण करताना विध्यार्थी




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा