Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ३० नोव्हेंबर, २०२५

टी.जे. महाविद्यालयाची स्वायत्तेतून उत्कृष्ट गुणवत्तेकडे वाटचाल--- कृष्णकुमार गोयल

 मुख्य संपादक --हुसेन मुलाणी 

टाइम्स 45 न्यूज मराठी 

मो:-9730867448



खडकी शिक्षण संस्थेचे, टिकाराम जगन्नाथ स्वायत्त महाविद्यालयात ‘पहिला स्वायत्त गुणपत्रक वितरण सोहळा’ उत्साहात आणि भव्यतेने साजरा करण्यात आला. प्रथम वर्षे कला, वाणिज्य आणि विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांच्या प्रथम सत्र परीक्षेत मिळवलेल्या शैक्षणिक प्रगतीचा गौरव करणारा हा महत्त्वपूर्ण सोहळा परीक्षा विभागाने आयोजित केला. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक परीक्षा विभाग प्रमुख दत्ताहरी मुपडे यांनी केले.प्रस्ताविकात त्यांनी परीक्षा विभागाने केलेल्या कामाचा आढावा घेत प्रश्नपत्रिका, परीक्षापद्धत्ती,पेपर तपासणी, निकाल याविषयी सविस्तर माहिती दिली.

    प्राचार्य डॉ. संजय चाकणे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, स्वायत्त म्हणून महाविद्यालयाचे पहिले वर्षे या पहिल्या वर्षाच्या पहिल्या सत्राची परीक्षा संपल्यानंतर सात दिवसाच्या आत निकाल लावून निकाल तत्पर लावण्याचा उच्चांक परीक्षा विभागाच्या माध्यमातून महाविद्यालयाने केला आहे. महाविद्यालयास स्वायत्ततेमुळे मिळणारे शैक्षणिक स्वातंत्र्य, अभ्यासक्रमातील गुणवत्ता वाढ आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबाबत माहिती दिली. सर्व विभागाचा चांगल्याप्रकारे निकाल लागला, विध्यार्थ्यांनी उत्तम यश मिळवले याविषयी समाधान व्यक्त केले.यावेळी प्रथम वर्ष कला वाणिज्य आणि विज्ञान विभागातून पहिल्या सत्रात अनुक्रमे पहिले, दुसरे आणि तिसरे येणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मान अध्यक्ष कृषकुमार गोयल, सचिव आनंद छाजेड, डॉ. काशिनाथ देवधर, रमेश अवस्थे, श्री फेंगसे या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

        संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल  अध्यक्षीय भाषण करताना म्हणाले “स्वायत्तता ही विद्यार्थ्यांच्या क्षमताविकासाची नवी संधी असून गुणपत्रिका ही त्यांच्या मेहनतीचा सन्मान आहे,”.यानंतर विविध विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करताना ते म्हणाले, “टी. जे. महाविद्यालयाची स्वायत्ततेकडून उत्कृष्ट गुणवत्तेकडे होत असलेली वाटचाल ही आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे. विद्यार्थी हेच संस्थेचे केंद्रबिंदू असून त्यांच्या प्रगतीसाठी सक्षम, नैतिक आणि आधुनिक शिक्षण देण्याची आमची बांधिलकी कायम आहे.” या समारंभासाठी विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या सकारात्मक अभिप्रायाने महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुष्टी प्राप्त झाली. महाविद्यालयाच्या स्वायत्ततेतील नाविन्यपूर्ण उपक्रम आणि गुणवत्तापूर्ण अध्यापन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीला नवी दिशा मिळत असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे सोहळ्याच्या यशस्वी आयोजनानंतर टी. जे. महाविद्यालयाची उत्कृष्टतेकडे सुरू असलेली ही वाटचाल पुढील काळात अधिक वेगाने आणि प्रभावीपणे पुढे जाईल, असा विश्वास अध्यक्ष यांनी व्यक्त केला.यावेळी त्यांनी प्राचार्य, परीक्षा विभाग, सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.हा सोहळा महाविद्यालयाच्या शैक्षणिक उत्कृष्टतेकडे सुरू असलेल्या वाटचालीची उज्ज्वल साक्ष देणारा ठरला असे मत त्यांनी व्यक्त केले.

    या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य महादेव रोकडे, सुचिता दळवी, राजेंद्र लेले, माटेकर, सर्व विभागप्रमुख, कर्मचारी व विध्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मेहनाज कौसर यांनी केले, तर आभारप्रदर्शन प्रा. शुभांगी पाटील यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा