*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147*
साद फाऊंडेशन इंदापूर या संस्थेचे सामाजिक बांधिलकी , योगदान मोठे -असे प्रतिपादन सौ.अनुष्का भरणे. यांनी केले
साद फाऊंडेशन ची "संविधान सन्मान दौड" वालचंदनगर मध्ये प्रचंड उत्साहात संपन्न. झाला असून या दौडमध्ये विक्रमी ६२२ धावपटुंनी सहभाग. घेतला होता
वालचंदनगरकरांनी दौडचा मनसोक्त थरार अनुभवला.
भारतीय संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वालचंदनगर येथे " साद फाऊंडेशन इंदापूर " या चॅरिटेबल ट्रस्ट (एनजीओ)च्या वतीने संविधान सन्मान दौड शनिवार दि. २९ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ८ ते १०:३० या वेळेत संपन्न झाली.
प्रमुख अतिथी म्हणुन महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सुन व कै.भगवानराव भरणे प्रतिष्ठान च्या सौ. अनुष्का अनिकेत भरणे, वालचंदनगर पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक रतिलाल चौधर, दैनिक सकाळ चे पत्रकार राजकुमार थोरात, भारत चिल्ड्रन्स ॲकॅडमी चे प्रिन्सिपल कृष्णदेव रामराव क्षीरसागर सर, श्री वर्धमान विद्यालय वालचंदनगर चे प्राचार्य कुंभार सर, विश्वासराव रणसिंग विद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक काळंगे, वालचंद विद्यालय कळंब चे अमित काळे, लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.शहा , विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाचे उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीक सर,, बीसीए चे अमोल गोडसे सर, रणसिंग कॉलेज च्या सुवर्णा बनसोडे मॅडम, श्री डॉ . पाखरे सर, वालचंदनगर पोलीस स्टेशन गोपनीय गणेश काटकर सर, सामाजिक कार्यकर्ते सुनील साबळे, नंदकिशोर विद्यालयाचे विकास कुंभार सर, रणजित पाटील , वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड चे इजाज अली शेख (आय. आर . मॅनेजर), आय.जे.जे.कॅनडी (हेड ॲडमीन ॲण्ड सिकृटी)हे सर्वजण तसेच अनेक शाळांचे शिक्षक उपस्थित होते.
प्रचंड उत्साहात झालेली ही स्पर्धा चार गटांत झाली.
*१७ वर्षांवरील मुलांच्या गटात*
१) प्रतिक महेश घोरपडे
२) पार्थ देविदास सातपुते
३) अजिंक्य रमेश हगारे
यांनी क्रमांक पटकावले तसेच
*१७ वर्षांखालील गटात*
१) अर्चित अमोल कडुदेशमुख
२) प्रथमेश शहाजी खंडागळे
३) समाधान संतोष हगारे.
या मुलांनी क्रमांक पटकावले.त्याचप्रमाणे
*१७ वर्षांवरील मुलींच्या गटात*
१) कु.संजना आप्पा पाटील
२) कु. पल्लवी पंडीत भोई
३) कु.भुमिका अमोल कोळी
यांनी बक्षिसे मिळवली तर
*१७ वर्षांखालील मुलींच्या गटात*
१) अंकीता अनिल वाघेला
२) सृष्टीप्रिया निलेश आधव
३) अंजली सचिन शेळके
यांनी क्रमांक पटकावले.
![]() |
*उत्कृष्ट नियोजन,चोख बंदोबस्त , प्राथमिक आरोग्य केंद्र लासुर्णे यांची तप्तर सेवा, अनेक शाळेच्या शिक्षकांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये या उपक्रमाविषयी प्रचंड आवड* या वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेच्या सुरवातीला संविधान निर्माते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते करून सुरवात झाली. मान्यवरांच्या हस्ते संविधान पुस्तकिचे पुजन व दिपप्रज्वलन केले. नंतर पोलीस उपनिरीक्षक रतिलाल चौधर साहेबांनी उद्देशिका वाचन करून सगळ्यांना ग्रहीत केले .
एकुण तब्बल ६२२ धावपटुंनी सहभाग घेतला. यावेळी मुलामुलींच्या मोठ्या १७ वर्षांवरील गटातील विजेत्या धावपटुंना प्रथम क्रमांकास प्रत्येकी रोख २५०० व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकांस प्रत्येकी रोख २००० व प्रमाणपत्र तसेच तृतीय क्रमांकास रोख १५०० व प्रमाणपत्र देण्यात आले...तर १७ वर्षांच्या खालील मुलामुलींच्या गटातील धावपटुंना प्रथम बक्षीसासाठी रोख २००० रू व प्रमाणपत्र, दुसऱ्या क्रमांकास प्रत्येकी १५०० व प्रमाणपत्र तसेच तृतीय क्रमांकास प्रत्येकी १००० व प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच सहभागी होणाऱ्या प्रत्येक धावपटुस सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष सुरज वनसाळे, संचालक आप्पासाहेब कदम, सतीश वाघमारे, बबलू वंचाळे, क्षितीज वनसाळे, रवि जाधव, हर्षल वाघमारे, आविष्कार साळवे, स्वयंसेवक, कर्मचारी, सचिव यांनी मेहनत घेतली. आणि वालचंदनगर पंचक्रोशीतील शेकडो नागरिकांनी या स्पर्धेचा आनंद लुटला.







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा