Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २२ नोव्हेंबर, २०२५

अबब.... चक्क नगरसेवक पदासाठी १. कोटी ३ लाखाची बोली--लोकशाहीची थट्टा केली जात आहे नागरिकाकडून संताप:- कुठे झाली बोली पहा...

 संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:--  9730 867 448



पुणे : पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर येथे नगरसेवक पदासाठी तब्बल १ कोटी ३ लाखांची, तर महिला नगरसेवक पदासाठी २२ लाखांची बोली लागल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने काही जण बिनविरोध झाल्यास त्यांच्याकडे संशयाने पाहिले जाऊ शकते, अशीही चर्चा रंगत आहे. 

मुळातच अशा प्रकारची बोली लावण्याची प्रथा लोकशाहीसाठी घातक असल्याचे नागरिकांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोग याकडे किती गांभीर्याने लक्ष देणार, हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असताना राजगुरूनगर नगरपरिषदेत कोट्यवधींची बोली. लावल्याची माहिती वाऱ्यासारखी पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पसरली आहे. मात्र, संबंधित प्रभाग कोणता याबाबत स्पष्ट माहिती अद्याप समोर आलेली नाही.

बोलीतून आलेल्या रकमेतून शहराचा विकास करावा, असा एकमुखी निर्णय झाल्याचेही काहीजण बोलत आहेत. विरोधकही या विषयावर बोलण्यास टाळाटाळ करत असून, "आपापसात साटलोट" झाल्याची चर्चा फिरत आहे.

परंतु नगरसेवक पदासाठी १ कोटी ३ लाखांची बोली लागते, हे निश्चितच लोकशाहीला धोकादायक आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने याबाबत तातडीने दखल घेणे आवश्यक आहे. ही लोकशाहीची सरळसरळ थट्टा असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा