सहसंपादक-- डॉ. संदेश शहा
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:--9922 419 159
राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांच्या पत्नी सौ. सारिका भरणे व माजी नगराध्यक्षा सौ. अंकिता मुकुंद शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरतशेठ शहा व पॅनल साठी झंझावाती प्रचार सुरू करून नागरिकांशी सुसंवाद साधला. यावेळी सौ. वैशाली भरत शहा, माजी नगरसेवक अनिकेत वाघ व प्रशांत सिताप, राजू चौगुले यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी सौ. सारिका भरणे मामी म्हणाल्या, माजी नगराध्यक्ष सौ. अंकिता मुकुंद शहा यांनी कोरोना महामारी
मध्ये इंदापूरकरांची सेवा केल्यामुळे शहरात तब्बल ८५ दिवस एकही कोरोनाचा रुग्ण नव्हता. सौ. शहा यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून सर्व जिव्हाळ्याच्या शक्ती एकत्र करून नागरिकांना अन्न तसेच औषधे उपलब्ध करून दिले. नागरिक त्याची आज देखील आठवण काढत आहेत. स्वच्छ भारत अभियानामध्ये भाग घेऊन इंदापूर शहर स्वच्छ, सुंदर व हरित बनविले. शहरात औषधी उद्यान बनविले. त्यामुळे इंदापूर शहराने सलग पाच वर्ष स्वच्छता अभियानात देश पातळीवर पुरस्कार संपादन केले. त्यांनी महिला बचत गटाचे सबलीकरण करण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यामुळे नागरिक आज देखील त्यांच्या कार्याची प्रशंसा करत आहेत. त्यांनी पाहिलेली उर्वरित स्वप्ने पूर्ण करण्यासाठी शहा परिवारातील माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना पक्षाने नगराध्यक्ष पदाचे तिकीट दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या चिन्हावर शिक्का मारून भरत शहा व त्यांच्या सहकाऱ्यांना विजयी करून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपले अनमोल मत द्या असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी माजी नगराध्यक्षा सौ. अंकिता मुकुंद शहा म्हणाल्या, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा यांनी इंदापूर शहर विकासासाठी कोणतेही राजकारण न करता सढळ हाताने निधी दिला. नगराध्यक्ष हा त्यांच्या विरोधी पक्षाचा असताना देखील त्यांनी शहर विकासास सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यामुळे शहरात कोट्यावधी रुपयांची विकासकामे झाली असून काही कामे सुरू आहेत. यापुढे देखील शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जनशक्तीने राष्ट्रवादी काँग्रेस पॅनेल च्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.
या घर टू घर प्रचार मोहिमेत प्रभाग एक चे उमेदवार उमेश रमेश मखरे, सुनीता अरविंद वाघ, प्रभाग दोन चे उमेदवार सुनीता अमर नलवडे, राजेंद्र गेना चौगुले, प्रभाग तीन चे उमेदवार वंदना भारत शिंदे, गणेश मेघश्याम पाटील, प्रभाग चारचे उमेदवार कोमल गौरव राऊत, शकील मकबूल सय्यद, प्रभाग पाच चे उमेदवार दीप्ती स्वप्नील राऊत, अक्षय शंकर सूर्यवंशी, प्रभाग सहा चे उमेदवार शुभम पोपट पवार, अंबिका पांडुरंग सूर्यवंशी, प्रभाग सात चे उमेदवार साबिया शहीद शिकलकर, मयुरी प्रशांत उंबरे, प्रभाग आठ चे उमेदवार सागर सुनील अरगडे, रजिया हजरत शेख, प्रभाग नऊ चे उमेदवार शोभा सुरेश जावीर, शैलेश देविदास पवार, प्रभाग दहा चे उमेदवार अनिता अनिल ढावरे, श्रेयस सुरेश गवळी, त्यांचे कार्यकर्ते यांनी सहभाग नोंदविला. त्यामुळे राजकीय वातावरण निर्मिती जोरात झाली असून पक्षाचे घड्याळ हे चिन्ह घरोघरी पोहोचण्यास मदत झाली.







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा