Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ६ नोव्हेंबर, २०२५

पूरग्रस्त शाळेतील विद्यार्थ्यांना धनशैल्य शिक्षण संस्थेतील मुलांकडून मदतीचा हात पूरग्रस्त भागातील शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

 अकलूज प्रतिनिधी 

 केदार लोहकरे 

टाइम्स 45 न्यूज मराठी


धनशैल्य विद्यालय गिरझणी,किडझी अकलूज व रोटरी क्लब अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हेल्पिंग हँड्स’ हा अनोखा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

           गेल्या महिन्यात जिल्ह्यातील अनेक भागांना पूराचा फटका बसला होता.त्यात तिऱ्हे (ता.सोलापूर), घोडके वस्ती,शिंगोळी,पीरटाकळी आणि तरडगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळांतील एकूण १८३ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य किट वाटप करण्यात आले.या किटमध्ये वह्या,स्टेशनरी,स्कूल बॅग,एक ड्रेस, हँडवॉश,कलर सेट आदी वस्तूंचा समावेश होता.


             या साहित्याचे संकलन धनशैल्य विद्यालय गिरझणी व किडझी अकलूज येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी ‘हेल्पिंग हँड्स’ या विशेष उपक्रमांतर्गत केले होते. बालचिमुकल्यांनी स्वतःच्या छोट्याशा दानातून पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मोठी मदत जमा केली असून त्यांच्या संवेदनशीलतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.या पूरग्रस्त शाळांची निवड सोलापूर दूध उत्पादक संघाचे व्हाइस चेअरमन दिपक माळी यांच्या सहकार्याने करण्यात आली.त्यांनी या संपूर्ण उपक्रमात मोलाची साथ दिली.या वितरण प्रसंगी धनशैल्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.मनिष गायकवाड म्हणाले की विद्यार्थ्यांनी केलेल्या मदतीचे आज खऱ्या अर्थाने सार्थक झाले आहे.अशा उपक्रमांमधून मुलांमध्ये सामाजिक बांधिलकी व संवेदनशीलता विकसित होते.या कार्यक्रमाला संस्थेचे संचालक अभिषेक टेके,रविकिरण फडे, विनायक सावंत,तसेच रोटरी क्लब अकलूजचे अध्यक्ष रो.केतन बोरावके व संचालक याबाजी सर उपस्थित होते.या कार्यक्रमास गावचे सरपंच,ग्रामसेवक,पंचायत समिती सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.ग्रामस्थांनी अशा सामाजिक उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक करत आयोजक संस्थांचे आभार मानले आणि अशा दुर्लक्षित शाळांकडे लक्ष दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा