Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १९ नोव्हेंबर, २०२५

रुई थोरातवाडी येथील तात्या गोविंद कचरे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

 *कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147*



रुई थोरातवाडी येथील ज्येष्ठ नागरिक आणि सदैव हसमुख, मितभाषी स्वभावाचे तात्या गोविंद कचरे (वय 68) यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने नुकतेच निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने रुई थोरातवाडी गावात तसेच बाबीरनगरी पंचक्रोशी परिसरात शोककळा पसरली आहे.

    तात्या कचरे हे रुई थोरातवाडीच्या माजी सरपंच कृष्णाबाई कचरे यांचे पती व  सरपंच यशवंत कचरे यांचे वडील होते. खडकवासला पाटबंधारे विभागात पाटकरी म्हणून 2018 रोजी ते निवृत्त झाले होते. त्यांच्या मागे पत्नी कृष्णाबाई कचरे,(माजी सरपंच) मुलगा यशवंत कचरे,(माजी सरपंच) सून रुपाली कचरे ( जिल्हा परिषद शिक्षिका), तीन मुली अनुक्रमे अनिता नंदकुमार बिचकुले, पिंकल प्रकाश वाडकर, प्रियंका बाळू शिंदे, नातवंडे असा परिवार आहे.   

      "साधेपणातला मोठेपणा सांभाळणारे, आपुलकी अन् आपलेपणा जपणारे व्यक्तिमत्त्व" सर्वांना सोडून गेल्याची भावना पै-पाहुणे, ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.

     त्यांच्या दुःखदनिधनाचे वृत्त समजताच महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री  दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सोनई परिवाराचे अध्यक्ष दशरथ माने दादा, पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती प्रवीण माने,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नानासाहेब देवकाते पाटील तसेच इतर मान्यवर, माजी आमदार यशवंत माने, माजी जि. प. सदस्य बाळासाहेब घोलप व इतर स्थानिक राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्त्यांनी भेट देऊन सरपंच यशवंत कचरे कुटुंबियांचे सांत्वन केले.

     तात्या गोविंद कचरे यांच्या निधनाने रुई थोरातवाडीने आधारस्तंभ असणारे एक प्रेमळ, सज्जन आणि कर्तबगार  गावकारभारी व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. तसेच यशवंत कचरे परिवारास या दुःखातून सावरण्याची परमेश्वररुपी शक्ती मिळो.

_____________________________________



____________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा