Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १९ नोव्हेंबर, २०२५

पाच वर्षाचा चिमडा विराज याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सातव्या रेकॉर्डची नोंद

 संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:--  9730 867 448


विराज दिपाली उद्धव चव्हाण या अवघ्या पाच वर्षाच्या चिमुकल्याची शीर्षासन योगासन ( हेडस्टॅन्ड पोज ) करणारा मुलगा म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याची अधिकृत मेल द्वारे कळविण्यात आले. याबाबतची सर्टिफिकेट, मेडल, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डची प्रत, ओळखपत्र व इतर साहित्य पुढील वीस दिवसात मिळेल असे कळविण्यात आले. 

 विराजने आपल्या पाचव्या वाढदिवसाच्या निमित्य कोणत्याही आधाराशिवाय 1 मिनिट 28 सेकंद शीर्षासन योगासन (हेड स्टॅन्ड पोज) केले. 




आजच्या मोबाईल च्या  दुनियेमध्ये लहान मुले मैंदानी खेळ नं खेळता मोबाईल मध्ये गुंतून असतात त्याला चिमुकला विराज अपवाद ठरत आहे. विराज शीर्षासन सोबतच वेगवेगळे योगा चे आसन करतो.

 विराज चे या अगोदर इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सहा रेकॉर्ड ची नोंद झालेली आहे त्यामध्ये 1) विविध प्राण्याची व पक्षाची आवाज काढणारा लहान मुलगा 2) गायत्री मंत्र गायन करणारा लहान मुलगा 3) महामृत्युंजय मंत्र गायन करणारा सर्वात लहान मुलगा 4) जन गण मन हे राष्ट्रगीत गायन करणारा लहान मुलगा. 5) सुखकर्ता दुखहर्ता हे श्री ची गणेशाची आरती गायन करणारा सर्वात लहान मुलगा. 6) महाराष्ट्र राज्य गीत गायन करणारा सर्वात लहान मुलगा  असे एकूण सहा विक्रम त्याच्या नावावर आहे.

  विराज हा देवताळा, लातूर येथील चिमूरडा असून तो इंदापूर येथील डॉ. कदम गुरुकुल या शाळेमध्ये जूनियर केजी मध्ये शिकतो.   

 विराजच्या या विक्रमाबाबत बोलताना विराजची आई  दिपाली उद्धव चव्हाण म्हणाली की विराजची मोठी बहीण प्रांजल चे आतापर्यंत इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये अकरा रेकॉर्डची नोंद झाली आहे. विराज व प्रांजल यांचे मिळून तब्बल अठरा रेकॉर्डची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. दोन बहिण भावाची  कमी वयामध्ये एवढ्या विक्रमाची नोंद होण्याची ही देशातील पहिलीच घटना असेल.

 विराजने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये केलेल्या सातव्या विक्रमा बाबत त्याचे समाज माध्यमातून कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा