Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १९ नोव्हेंबर, २०२५

भयमुक्त मतदानासाठी अकलूज पोलिसांचा निर्धार तडीपरी व बोंन्डची मोठी कारवाई प्रलोभनाला बळी पडू नका:- पोलीस उपविभागीय अधिकारी, "संतोष वाळके" यांचे मतदारांना आवाहन

 जेष्ठ पत्रकार संजय लोहकरे 

टाइम्स 45 न्यूज मराठी 

मो:-9822 203 255



अकलूज नगरपरिषदेची निवडणूक जाहीर होताच परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी अकलूज पोलिसांनी सविस्तर उपाययोजना राबवल्या असल्याची माहिती डीवायएसपी संतोष वाळके यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अकलूज पोलीस स्टेशनचे निरीक्षक नीरज उबाळे उपस्थित होते.

          वाळके यांनी सांगितले की, निवडणूक कालावधीत मतदारांना कोणत्याही प्रकारचे प्रलोभन, आमिष,दहशत व धाकधपटशाला बळी न पडता भयमुक्त वातावरणात मतदान करता यावे यासाठी पोलिस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे.


*गुन्हेगारांवर लक्ष – तडीपारी व बॉन्डची कारवाई*

           मागील १० वर्षातील रेकॉर्ड तपासून जवळपास ३०० ते ३५० संभाव्य गुन्हेगारांची यादी पोलिसांनी तयार केली आहे.महाराष्ट्र पोलीस अधिनियम ५५,५६,५७ नुसार तडीपारीचे नऊ प्रस्ताव पाठवले असून नवीन बीएनएस ॲक्टच्या कलम १२०,१२९,१३० नुसार प्रतिबंधक बॉन्डही घेतले जात आहेत.निवडणुकी दरम्यान कोणत्याही बेकायदेशीर हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी एसएसटी (फिरती पथके),एफएसटी (स्टॅटिक पथके) तैनात करण्यात आली आहेत.रात्री पेट्रोलिंग, अचानक नाकाबंदी,कोंबिंग ऑपरेशन सुरू असून चोरी,अवैध धंदे व संशयितांवर सातत्याने कारवाई चालू आहे.अलीकडेच ५ चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले असल्याचे त्यांनी सांगितले.

        निवडणुकीचा काळ जवळ आल्याने अकलूज पोलिसांनी एसआरपीएफ,आरसीपी तसेच जिल्हा मुख्यालयाकडून अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी केली आहे. नातेपुते,माळशिरस,वेळापूर पोलीस ठाण्यांमधूनही अतिरिक्त कर्मचारी 

वापरण्यात येणार आहेत.इलेक्शन कमिशनकडून मिळालेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार संवेदनशील बुथची प्राथमिक यादी पाठवली असून अंतिम मान्यता आयोगाकडून मिळेल.आवश्यकतेनुसार रूट मार्च व विशेष पथके तैनात केली जातील.


*✔️ नागरिकांना आवाहन*

डीवायएसपी वाळके म्हणाले, "कोणी धमकावत असेल,पैसे वाटत असेल,प्रलोभन देत असेल किंवा कोणतेही बेकायदेशीर कृत्य दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवा.तुमचे नाव गोपनीय ठेवले जाईल.पारदर्शक आणि शांततेत निवडणूक पार पडणे हेच आमचे ध्येय आहे."




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा