उपसंपादक -+नुरजहां शेख
टाइम्स 45 न्यूज मराठी
अखिल भारतीय माळी समाज प्रबोधन व शिक्षण संस्थेची विश्वस्त,मध्यवर्ती कार्यकारी मंडळाची सभा व समाज बांधव मेळावा रविवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी उत्साहात संपन्न झाला.
सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष दिलीप राऊत हे होते.प्रारंभी क्रांतीसुर्य महात्मा फुले,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे व संत सावतामाळी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
अ.भा.माळी समाज प्रबोधन व शिक्षण संस्था ही गरजू विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणे व त्यांचा सर्वांगीण विकास करणे यासाठी काम करते.या संस्थेचे सर्वप्रथम विश्वस्त मंडळ मीटिंग त्यानंतर मध्यवर्ती कार्यकारणी मीटिंग पार पडली.यावेळी महाराष्ट्रभरातून मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि माळी समाजातील बांधवांनी उपस्थिती दर्शविली होती.
यावेळी संस्थेचे सरचिटणीस प्रशांत एकतपुरे यांनी संस्थेच्या स्थापनेपासूनचा आढावा घेतला व जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती चा लाभ मिळावा यासाठी संस्थेला आर्थिक मदतीचे आवाहन केले.त्याला प्रतिसाद म्हणून मुंबईचे उद्योजक दशरथ माळी (रु.१ लाख), राजू सुंदरकर अमरावती(रु.५१ हजार) ,सुनील फरांदे,नाशिक रु.(२१ हजार), हिरामण बच्छाव कल्याण (रु.११ हजार),अतुल गिरमे(रु.१० हजार),अमोल शिंदे (रु.१० हजार),दीपक गिरमे,कल्पेश पांढरे,रितेश पांढरे प्रत्येकी रु.५ हजार देणगी दिल्याबद्दल संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सभेप्रसंगी नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी संस्थेसाठी एक डिजिटल सॉफ्टवेअर तयार करून संपूर्ण माळी समाजाची माहिती एकत्रित करण्याचा अभिनव व दूरदर्शी प्रस्ताव मांडला.या सूचनेमुळे संस्थेच्या डिजिटल सक्षमीकरणास नवी दिशा मिळेल.
या सभेसाठी संपूर्ण महाराष्ट्र मधून आलेल्या समाजबांधवांची नाशिक येथील हॉटेल ट्रीट (फोर स्टार) हॉटेलमध्ये निवासाची,भोजनाची व सभेसाठी हॉल इत्यादी सर्व मोफत सुविधा संस्थेच्या विश्वस्त नीलिमाताई सोनवणे व त्यांचे चिरंजीव आनंद सोनवणे यांनी स्वखर्चातून केली होती. त्यांचा हा त्याग आणि उदारता समाजासाठी आदर्श आहे. त्याबद्दल सोनवणे कुटुंबाचे संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. ज्यातून समाजातील एकतेची भावना आणि संस्थेवरील विश्वास अधोरेखित झाला.
संस्थेने तब्बल १ कोटी ३० लाख रुपयांच्या ठेवींचा ऐतिहासिक टप्पा पार केला.हा यशस्वी मैलाचा दगड गाठण्यासाठी संस्थेचे मुख्य विश्वस्त,अध्यक्ष सरचिटणीस,खजिनदार व सर्व विश्वस्त मंडळ यांनी केलेले नियोजन पारदर्शक कार्यपद्धती व परिश्रमाबद्दल सर्व समाज बांधवांनी कौतुकाची दाद दिली. संस्थेची आर्थिक भक्कमता वाढत असल्याचे हे ठळक घोतक आहे. नाशिक मधील या सभेमुळे समाजातील एकोपा, विकास आणि प्रबोधनाचा सुंदर संगम ठरला.या सुवर्णक्षणाने माळी समाजाच्या वाटचालीला नव्या ऊर्जा, नवी दिशा आणि नवे बळ दिले. यावेळी इ.१०वी व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.
यावेळी संस्थेचे मुख्य विश्वस्त पद्मकांत कुदळे, विश्वस्त प्रकाश लोंढे, जयवंतराव गायकवाड, मोतीलाल महाजन, विश्वनाथ भालिंगे, रवी चौधरी, नीलिमा सोनवणे, तज्ञ विश्वस्त दत्तात्रय बाळसराफ,बाजीराव तिडके, खजिनदार विजय लोणकर, उपाध्यक्ष हिरामण बच्छाव,ऍड. गोविंद बादाडे, पुंडलिक लव्हे,भाऊसाहेब मंडलिक,अतुल गिरमे,दीपक गिरमे, मनोज झगडे, कल्पेश पांढरे, रितेश पांढरे,अमोल शिंदे,संस्थेचे क्लार्क नंदकुमार लडकत, अकाउंटंट जयप्रकाश बगाडे व शुभम साबळे आदी बहुसंख्येने उपस्थित होते.








कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा