Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १९ नोव्हेंबर, २०२५

पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळ विभागात झोपा काढू आंदोलन करणार ....

 उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्युज मराठी



महानगरपालिका शिक्षण विभाग उर्दू शाळेच्या विविध समस्या बाबत आज श्री.चांदभाई बळबट्टी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पुणे महापालिका शिक्षण विभागाच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे प्रशासकीय अधिकारी व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना भेटून निवेदन देण्यात आले . निवेदनामध्ये उर्दू शाळेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेत रिक्त असलेल्या जागी शिक्षक भरती त्वरित करावी ,त्याचप्रमाणे अंगणवाडी व बालवाडी उर्दू माध्यमासाठी स्वतंत्र सेविका व शिक्षिका यांची भरती अनेक वर्षापासून प्रलंबित असून ती त्वरित पूर्ण करावी , उर्दू माध्यमाच्या शाळेतील भौतिक सुविधा या अर्धवट अवस्थेत असून शाळांच्या दुरावस्था झालेली आहेत.      


    

 - शाळेला रंगरंगोटी ,स्वच्छतागृहांची असुविधा , अस्वच्छ पटांगण , तुटलेले खराब झालेले बेंचेस ,  काही शाळेत वर्ग खोल्यांची असलेली कमतरता ,अनेक शाळेचे स्लॅब हे लिकेज आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी खूप मोठा धोका निर्माण झालेला आहे त्याचप्रमाणे ज्या वर्ग खोल्यातली खराब झालेली वायरिंग ,फॅन ,लाईट बोर्ड आणि इतर अनुषंगाने दुरुस्ती व्हावी. काही शाळांत शिपाई पद अद्यापही रिक्त आहे शिपाई चे कामही शिक्षकांना करावे लागतात त्यामुळे शैक्षणिक कामावर त्याचा परिणाम होत आहे ,           



                सर्व शाळांमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचा बोर्ड दर्शनी भागात लावावा , उर्दू शाळेसाठी क्रीडा निकेतनची अत्यंत आवश्यकता आहे .उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण व त्याचे मूल्यांकन होणे गरजेचे असून , चालू शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासून शाळेला अध्यापन पुस्तके पुरेश्या प्रमाणात मिळालेली नाहीत ही बाब गंभीर असून शिक्षण हक्क कायद्याचा भंग होत आहे.आमच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात अन्यथा पुढील काळामध्ये प्राथमिक शिक्षण मंडळाच्या दालनामध्ये झोपा काढू आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.निवेदन देताना मा .फिरोज मुल्ला सर , माहिती अधिकार कार्यकर्ते श्री . एजाज खान श्री.संदीप शेंडगे , श्री.दौलाभाई पीरजादे , लोकनेते श्री.हुसेन दादा शेख, ज्येष्ठ समाजसेवक साबीरभाई सय्यद, ज्येष्ठ मार्गदर्शक श्री .राजूभाई इनामदार , बागअली गोकाक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.**

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा