Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २० नोव्हेंबर, २०२५

अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयात अंतर महाविद्यालयीन वेट लिस्टिंग स्पर्धा संपन्न...

 *अकलूज -- प्रतिनिधी*

     *केदार लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*



अकलूज येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर अंतर्गत आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज येथे करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये विद्यापीठांतर्गत २५ महाविद्यालयांमधील ४० मुले व २० मुली सहभागी झाले होते.      

           या महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेचे उद्घाटन एस.एस.जी.एम.महाविद्यालय,

कोपरगावचे उप-प्राचार्य डॉ.घनश्याम भगत यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.के.टिळेकर हे होते. 

              पुस्तकी ज्ञानाबरोबरच जीवनातील खेळाचे महत्व अनन्य साधारण आहे.खेळ विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी मदत करतो.असे मत उद्घाटक डॉ.घनश्याम भगत यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी क्रीडा परिषदेचे सचिव विशाल होनमाने सोलापूर विद्यापीठाच्या निवड समितीचे अध्यक्ष धनंजय देशमुख,सदस्य संतोष गवळी,दादासाहेब कोकाटे इत्यादी सदस्य उपस्थित होते.याच बरोबर महाविद्यालय सीडीसी सदस्य डॉ.एच.के.आवताडे,प्रा.व्ही.बी. सूर्यवंशी,डॉ.बाळासाहेब मुळीक, ग्रंथपाल डी.एस.पाटील,डॉ.एन.टी. लोखंडे,डॉ.व्ही.एस.शिंदे,पर्यवेक्षक श्री शेंडगे,कार्यालयीन रजिस्टार  राजेंद्र बामणे आदी उपस्थित होते तसेच स्पर्धा पार पाडण्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळातील क्रीडा शिक्षक प्रा.अरविंद वाघमोडे,संजय राऊत,बाळासाहेब भोसले,लोंढे सर महाविद्यालयाचे माजी खेळाडू श्री ऋतुराज गायकवाड,चांदनी मुलाणी उपस्थित होते.या स्पर्धेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी,यांनी मोलाचे सहकार्य केले.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.के.के.कोरे यांनी केले तर आभार प्रा.दादासाहेब कोकाटे यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा.स्मिता पाटील यांनी केले. 



स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे

*वेटलिफ्टिंग मुले 60 किलो वजन गट*- हार्दिक अविनाश लबडे (प्रथम क्रमांक)शिवाजी नाईट कॉलेज सोलापूर,पृथ्वीराज संतोष गायकवाड (द्वितीय क्रमांक),बी. एम.आय.टी.सोलापूर,स्वप्निल दादासो पाटील(तृतीय क्रमांक) - उमा कॉलेज पंढरपूर 

*वजन गट 65 किलो* 

१) मित्रप्पा (प्रथम क्रमांक) बी.पी.एड कॉलेज सोलापूर, भीमाशंकर मालगोंडे (द्वितीय क्रमांक) संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा,युवराज वाघमारे (तृतीय क्रमांक)उमा कॉलेज पंढरपूर

 *वजन गट 71 किलो*

आर्यन सणस (प्रथम क्रमांक) शिवाजी नाईट कॉलेज सोलापूर, रिषभ सिंग(द्वितीय क्रमांक) संगमेश्वर कॉलेज सोलापूर,अजिंक्य कुमार पोतराज(तृतीय क्रमांक) संगमेश्वर नाईट कॉलेज सोलापूर 

*वजन गट 69 किलो*

नित्यानंद पट्टणशेट्टी(प्रथम क्रमांक) संगमेश्वर कॉलेज सोलापूर,ओंकार गरड(द्वितीय क्रमांक)बी.पी.एड कॉलेज सोलापूर,रितेश पेढे(तृतीय क्रमांक)संगमेश्वर कॉलेज सोलापूर 

*वजन गट 88 किलो*

आयुष मुरूमकर (प्रथम क्रमांक)शिवाजी नाईक कॉलेज सोलापूर,प्रसाद बाळासाहेब जाधव - (द्वितीय क्रमांक)बी.एम.आय.टी. सोलापूर 

*वजन गट 94 किलो* 

यशराज सचिन कदम(प्रथम क्रमांक) शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज 

*वजन गट 110 किलो*

अक्षय शांताराम कट्टिमणी (प्रथम क्रमांक)शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज,सुजित कोळेकर(द्वितीय क्रमांक) बी.एम. आय.टी.सोलापूर 

*वजन गट 110 किलो +* 

आदित्य सुभाष चव्हाण(प्रथम क्रमांक) शिवाजी नाईट कॉलेज सोलापूर.                               *वेटलिफ्टिंग मुली निकाल* 

*वजन गट 48 किलो*  

कु.ऋतुजा लक्ष्मीकांत पेंटी(प्रथम क्रमांक) एच.एन.कॉलेज सोलापूर 

*वजन गट 53 किलो*

ज्ञानेश्वरी संतोष महाडीक(प्रथम क्रमांक)शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज 

*वजन गट 58 किलो*

आर्या विनय इब्रामपुरकर(प्रथम क्रमांक)शिवाजी नाईट कॉलेज सोलापूर,आर्या अर्जुन काटकर- (द्वितीय क्रमांक) शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज 

*वजन गट 63 किलो*

१) हर्षदा सचिन पठारे(प्रथम क्रमांक)शिवाजी नाईक कॉलेज सोलापूर,शारदा अमर राजुर (द्वितीय क्रमांक) सोलापूर 



*वजन गट 69 किलो* 

साक्षी सोमनाथ घाडगे (प्रथम क्रमांक)शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज,भाग्यश्री मल्हारी बनकर(द्वितीय क्रमांक) अर्धनारी नटेश्वर महाविद्यालय  वेळापूर,संस्कृती जयकुमार कांबळे  (तृतीय क्रमांक)वाय.सी.एम.कॉलेज करमाळा 

*वजन गट 77 किलो*

आरती हनुमंत दाडमोडे (प्रथम क्रमांक)बी.पी.एड.कॉलेज सोलापूर, साक्षी सूर्यकांत अहिरवाडी(द्वितीय क्रमांक)शिवाजी नाईट कॉलेज सोलापूर 

*वजन गट 86 किलो*  

सोनाली विश्वनाथ पवार(प्रथम क्रमांक)शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज 

*वजन गट 86 किलो +*

 प्रांजली तुषार पगारे (प्रथम क्रमांक) शिवाजी नाईट कॉलेज सोलापूर,वैष्णवी नारायण माने (द्वितीय क्रमांक) शिवाजी नाईक कॉलेज सोलापूर,अस्मिता अजय पताळे(तृतीय क्रमांक) शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा