इक्बाल बाबासाहेब मुल्ला( पत्रकार )
सांगली-मो:-8983 587 16
हल्ली कोणत्याही लग्नसमारंभात अथवा रिसेप्शन मध्ये सऱ्हास "जेवण संपल्याचे" प्रकार मोठ्या प्रमाणात घडतं आहेत.1000 लोकांचे जेवण असेल आणि वधुपित्याने 1500 लोकांचे जेवण केले तरी "जेवण" का संपते ??? याचा "शोध" घेतला असता धक्कादायक सत्य समोर आले. बिन बुलाये मेहमान मुळे "वधुपित्याचे" एखाद्या लग्नात 300-500 लोकांप्रमाणे 10000 - 20000 रुपयांचे "नुकसान" होत असेल तर निमंत्रण पत्रिकेसोबत जेवणाचे कुपन. देणे हा "पर्याय " होऊ शकेल का ??
*बिन बुलाये..हाथ धुलाये !
हिंदीत ही म्हण आहे "बिन बुलाये ..हाथ धुलाये" ..अर्थात आमंत्रण नसतानाही लग्नात जाऊन फुकट जेवण करणे होय. आज काल लग्नात "फुकटखाऊ" लोकांची संख्या प्रचंड वाढली आहे. धक्कादायक म्हणजे लग्न किती मोठे आहे त्यावरून फुकट खाणाऱ्या लोकांची योजना. ठरते. हे सर्व फुकटखाऊ एकमेकांशी "संपर्कात" असतात,आणि नियोजित असणाऱ्या "विवाहाची माहिती" ते एकमेकांना देत असतात. विवाहाचा हॉल कोणता आहे ? त्यावरून किती लोक फुकट खायचे याची स्ट्रॅटेजी ठरत असते. समजा सांगलीतील छोटा हॉल असेल तर 200- 300 लोक बाहेरचे "एडजेस्ट होतात, मोठा लॉन असेल तर मोठ्या हॉल मध्ये 500 पेक्षा जास्त फुकटखाऊ जेवण घेऊ शकतात,आणि उदाहरण द्यायचे असेल तर "शाही दरबार" प्रमाणे एखादा मोठा अवाढव्य "लॉन" असेल तर 1000 लोक. आरामात फुकट खाऊ शकतात.काही मोठ्या हॉल मध्ये फुकट खाण्यासाठी l5 -10 टेम्पो भरून लोक येतात असा धक्कादायक खुलासा नुकताच झाला आहे. त्याशिवाय हॉलजवळ असणारे "संशयित फुकटखाऊ" आवर्जून हजेरी लावतातच. अशा लोकांना चाप लावणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे.
*कष्ट करून लग्न करणाऱ्या मुलीच्या पित्याची तारांबळ दुर्दैवी !*
पै -पै करून "पैसे" साठवलेल्या मुलीच्या वडिलांची जेवण संपल्यावर उडणारी तारांबळ हृदयद्रावक असते. किती लोक येणार या "हिशोबाने" मुलीच्या वडिलांनी "जेवण" बनवलेले असते.तरीदेखील जेवण संपते आणि " मुलाकडील लोकांना" जेवण मिळतं नाही.हा झालेला अपमान फार वाईट असतो. हल्ली मोठ्या प्रमाणात हें घडतं आहे. वलीमा अर्थात "रिसेप्शन " ला देखील असाच अनुभव कित्येकांना आलेला आहे.
*फुकटखाऊ सापडल्यास 2 ते 7 वर्ष शिक्षा ! लग्नमंडपाबाहेर हा बोर्ड लावावा का??*
समजा एखादा फुकटखाऊ लग्नात अथवा रिसेप्शन मध्ये सापडल्यास ,त्याला पोलिसांच्या ताब्यात दिल्यास कलम 442 / 452 प्रमाणे त्याला 2 ते 7 वर्षाची "शिक्षा" होऊ शकते.अशा फुकटखाऊ लोकांना "धडा" शिकवण्यासाठी अद्द्दल घडणे आवश्यक आहे. शिक्षा होते हें माहित झाल्यास काहीप्रमाणात फुकटखानाऱ्या लोकांपासून "आळा" बसेल
*लग्नपत्रिकेसोबत 'कुपन"देने हा #पर्याय होऊ शकेल ??*
लग्नसमारंभात "बिन बुलाये मेहमान" टाळण्यासाठी पत्रिकेसोबत कुपन देने हा पर्याय होऊ शकतो. मुंबई - दिल्ली अशा मोठ्या विवाहसमारंभात प्रत्येक निमंत्रितांना एक कुपन दिले जाते.त्याने विवाहाला येताना सोबत घेऊन यायचे असते.कुपन नसेल तर प्रवेश "नाकारला" जातो. "ओळखीचे" असतील तर प्रवेश दिला जातो.अशा नियोजनामुळे पैशाची बचत होते आणि जेवण न संपल्याने वधुपित्याचा "अपमानही" होणार नाही
*5 फुकटखाऊ सापडले ! भांडी धुण्याची शिक्षा !*
सांगलीतील एका सुप्रसिद्ध हॉल मध्ये 5 जेष्ठ यायचे आणि यच्छेद "ताव" मारून "वाढपी लोकांना "ना बडबडत जायचे. हॉल मॅनेजरच्या. लक्षात आले की कुणाचेही लग्न असेल तर हें 5 लोक कसे येतात ?? त्याने जेवण झाल्यावर वधू आणि वरपित्याला सोबत घेत त्यांच्याकडे जाऊन तुम्ही. पाहुणे कुणाचे ??? हा प्रश्न केला.त्यातील एकाने "वधू" हें नावं घेतले.तेंव्हा वधुपित्याने आपण ओळखत नसल्याचे सांगितले. एकाने वरपक्ष असे सांगितले तेंव्हा वरपित्याने आपण "ओळखत" नसल्याचे सांगितले. चोरी पकडली गेली होती.सर्व फुकटखाऊ हात जोडत माफी मागत होते. सर्वांना "गोड प्रसाद" दिला गेला आणि सर्वांना भांडी धुण्याची प्रेमळ शिक्षा दिली गेली आणि सर्वांचे फोटो काढले गेले. असे शेकडो फुकटखाऊ असतात.फक्त ते "नजरेत" येत नाहीत.
यावर मार्ग म्हणून "कुपन देणे हा पर्याय होऊ शकतो.त्याची अमलबजावणी होणे खरंच गरजेचे वाटते.
इकबाल बाबासाहेब मुल्ल
( पत्रकार )
संपादक - सांगली वेध
संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.
मोबाईल - 8983587160








कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा