*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147*
----- बारामतीजवळील वंजारवाडी परिसरातील वनक्षेत्रात दारू पिताना दोन अनोळखी गटांमध्ये वाद होऊन मारहाण झाली. दोन्ही गट काही अंतरावर बसलेले असताना बोलाचाली सुरू झाली आणि त्याचे रूपांतर दगड, हात व बुक्क्यांनी हाणामारीत झाले. या मारहाणीत गणेश लोणकर या व्यक्तीस छाती, पाठ व खांद्यावर कापिव जखमा झाल्या असून त्याच्या अंगावर धारदार हत्याराने हल्ला झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणात दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात अनोळखी आरोपींविरूद्ध तक्रारी दाखल केल्या होत्या. संतोष पोपट जाधव यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये सुशील कुमार मिश्रा, भूपेंद्र सिंग आणि लोकेश दरपे मूळ राहणार राजस्थान हल्ली राहणार बारामती हे आरोपी निष्पन्न झाले असून त्यांना जीव मारण्याचा प्रयत्न करणे या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
तर लोकेश दरपे यांनी तीन अनोळखी व्यक्तींविरोधात फिर्याद दाखल केली आहे. त्यामध्ये गणेश लोणकर राहणार कसबा, संतोष जाधव साहिल साळवे राहणार आमराई बारामती हे आरोपी निष्पन्न झाले आहेत. त्यांच्याविरुद्ध इच्छापूर्वक दुखापत पोहोचवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना वंजारवाडी चे जवळ असलेल्या वनविभागाचे जमिनीचे शेजारी घडली.
प्रकरणाची गुंतागुंत लक्षात घेऊन बारामती तालुका पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी या घटनेची विशेष दखल घेत तपास वेगाने सुरू केला. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून उपस्थित साक्षीदारांचे जबाब नोंदवले.
तांत्रिक पुरावे, घटनास्थळावरील निरीक्षणे आणि मिळालेल्या माहितीनुसार आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. न्यायालयाने अटक करण्यात आलेल्या आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास साहेब पोलीस निरीक्षक विक्रम पवार करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार पोलीस चव्हाण सुरेंद्र वाघ भारत खारतोडे अमोल पवार यांनी केली आहे.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा