Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २० नोव्हेंबर, २०२५

महर्षी प्रशालेत वार्षिक स्नेहसंमेलनातून भारतीय संस्कृती व पारंपारिक दर्शन..

 यशवंतनगर---प्रतिनिधी

नाझिया. मुल्ला 

टाइम्स 45 न्यूज मराठी



शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर येथे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील स्मृती भवन यशवंतनगर येथे उत्साहात संपन्न झाला.

उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी डॉ.श्रीकांत नंदकुमार देवडीकर किडनी विकार तज्ञ एमडी मेडिसिन अकलूज, अॅड.नितीनराव खराडे सभापती स्थानिक प्रशाला समिती उपस्थित होते. सुमधुर स्वागत गीतातून सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. 

  प्रास्ताविकातून मुख्याध्यापक संजय गळीतकर यांनी प्रशालेच्या यशाची दैदिप्यमान परंपरा वर्णन करत विद्यार्थ्यांना कलेचे महत्त्व विषद केले.




        सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते सहकार महर्षि शंकरराव नारायणराव मोहिते पाटील व श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.

    वार्षिक स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक आनंदाचा क्षण असून यातून नेतृत्व व कौशल्याला वाव मिळतो असे मत प्रमुख अतिथी 

 डॉक्टर श्रीकांत देवडीकर यांनी आपल्या मनोगतातून मांडले.

    रंगमंच पूजनानंतर सकाळ सत्रात महर्षि वाद्यवृंदाने बहारदार गीतांचे सादरीकरण करत उपस्थित प्रेक्षकांची वाहवा मिळवली. इयत्ता पाचवी ते आठवीच्या कलाकारांनी बालगीत शेतकरी गीत, विविध प्रादेशिक गीत देशभक्तीपर गीतांचे उत्कृष्ट सादरीकरण केले.

   दुपार सत्रात इयत्ता नववी ते बारावीच्या कलाकारांनी दक्षिणात्य गीत, पारंपारिक नृत्य, सेमी क्लासिकल नृत्य, गरबा नृत्य अशा विविध विषयांवर बहारदार गीतांचे सादरीकरण केले. दोन्ही सत्रात मिळून तीस गाण्यांचे अप्रतिम सादरीकरण करण्यात आले. 

स्नेहसंमेलनासाठी सर्व पालकांची उपस्थिती लक्षणीय होती. दुपार सत्राच्या शेवटी निकाल वाचन व पारितोषिक वितरण समारंभ प्रमुख अतिथींच्या हस्ते संपन्न झाला. 

         स्नेहसंमेलनासाठी सुनील कांबळे व औदुंबर भिसे यांनी परीक्षकाचे काम पाहिले. 




   कार्यक्रमासाठी प्रशाला समिती सदस्य कैलास चौधरी, अनिल जाधव विनोद जाधव, नितीन इंगवले देशमुख, विविध शाखाप्रमुख शिवाजी पारसे, संजय मुंगसे,सुनीता वाघ ,अनिता पवार ,प्र.उपमुख्याध्यापक आसिफ झारेकरी, पर्यवेक्षक अंकुश एकतपुरे उपस्थित होते.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक नागेश सोनवणे व सहशिक्षिका नाझिया मुल्ला यांनी केले तर आभार प्राध्यापक धनंजय देशमुख यांनी मानले.

   वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वी होण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व सेवक बंधू भगिनी यांनी कष्ट घेतले.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा