सहसंपादक --संदेश शहा
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:--9922 419159
शहाजीनगर ( ता. इंदापूर ) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने सन २०२५-२६ च्या रौप्यमहोत्सवी ऊस गळीत हंगामामध्ये उत्कृष्ट कामगिरी करत एक लाख मे. टन ऊसाचे गाळप पुर्ण केले, असल्याची माहिती कारखान्याच्या अध्यक्षा सौ. भाग्यश्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
कारखान्याने ऊस गाळपाचा एक लाख मे. टन गाळपाचा पल्ला अल्पावधीतच पार केल्याबद्दल कारखान्याचे संस्थापक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार, अधिकारी, कर्मचारी व हितचिंतक, अध्यक्ष, संचालक मंडळाचे अभिनंदन केले आहे. कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केल्याने गाळप क्षमता प्रतिदिनी ३५०० मे. टन असताना, सध्या कारखान्याकडून प्रतिदिनी ५५०० ते ५७०० मे. टन उच्चांकी क्षमतेने ऊसाचे गाळप सुरू आहे. कारखान्याचे सहवीज निर्मिती, इथेनॉल आदी उपपदार्थ निर्मिती प्रकल्पामधून कार्यक्षमतेने उत्पादन सुरू आहे. चालू हंगामात कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शना खाली सुमारे ७ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्धिष्ट पूर्ण करण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील असल्याची ग्वाही याप्रसंगी अध्यक्षा सौ.भाग्यश्री पाटील यांनी दिली.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे, लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, ॲड. कृष्णाजी यादव, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, राजकुमार जाधव, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, उमेश पाटील, महेशकुमार शिर्के, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगिता पोळ, कल्पना शिंदे, कार्यकारी संचालक नवनाथ सपकाळ, सर्व अधिकारी, शेतकरी उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा