Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २० नोव्हेंबर, २०२५

राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार ने अकलूज मधील निष्ठावंतांना डावलून भाजप चा नगराध्यक्ष पदाचा मार्ग केला मोकळा ?

 पत्रकार --बाळासाहेब गायकवाड 

 मो:-9890182890



अकलूज नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अर्जाची छाननी नुकतीच अकलूज नगरपातिषदेत झाली असून


१४६ पैकी १०१ अर्ज नगरसेविकासाठी मंजूर झाले आहेत तर नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जातीच्या महिलासाठी राखीव असून त्यासाठी ०७ महिलांनी अर्ज दाखल केले होते त्यापैकी ०६ महिलांचे अर्ज वैद्य ठरविण्यात आले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस च्या सौ. प्रतिभा विलास गायकवाड यांचा अर्ज अवैद्य ठरविण्यात आला कारण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस ने निष्ठावंतांना जाणून बुजून डावलले गेल्याची चर्चा दिवसभर माळशिरस तालुक्यात चालू होती. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे सरचिटणीस यांना जाणून बुजून डावलन्यात आले तसेच सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस चे अल्पसंख्यांक चे सरचिटणीस व आमदार उत्तमराव जानकर यांचे खांदे समर्थक साजिद भाई सय्यद यांनाही डावलन्यात आले आहे तसेच अकलूज शहर राष्ट्रवादी चे अध्यक्ष सुरेश गंभीरे आणि माझी ग्रामपंचायत सदस्य दादाभाई तांबोळी हे पक्षाचे अतिशय निष्ठावंत कार्यकर्ते होते व आहेत त्यांनाही पक्षाने डावलले आहे ज्यांनी आक्खा आयुष्य पवार साहेबांच्या पक्षासाठी वाहिले ते माझी जिल्हा परिषद व समाज कल्याण सभापती कै. नामदेव गायकवाड यांचे चिरंजीव सिद्धार्थ ( गरीबदास ) गायकवाड यांनी तर प्रत्येक निवडणुकीत तिरंगा झेंड्याच्या तुतारी पक्षाचा ड्रेस शिवून गावभर फिरून पक्षाचा प्रचार करीत होते.                 






                                               त्यांनाही दुसऱ्या पक्षात जाऊन तिकीट घ्यावे लागले ग्रामपंचायतीच्या माझी सदस्य व अकलूज बचत गटाच्या सौ. प्रतिभा विलासनंद गायकवाड यांनी पक्षाचे ध्येय धोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविले तसेच बचत गटाच्या माध्यमातून वर्षाला १० कोटीची उलाढाल बचत गटाच्या माध्यमातून करत आहेत प्रत्येक महिलांना बचत गटाच्या माध्यमातून लाखो रुपयाचे कर्ज उपलब्ध करून दीले व त्यांच्या कुटुंबाचा जीवन मन उंचवीण्याचा प्रयत्न करीत आहेत आज अकलूज मध्ये ४०५ महिलांचे बचत गट असून ४०९५ महिलांचे नेतृत्व सौ. प्रतिभा गायकवाड करीत आहेत. आज जवळजवळ ४००० महिलांच्या व त्यांच्या कुटुंबाच्या अंदाजे ७,००० मतदानाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद

चंद्र पवार पक्ष मुखले असून सौ. प्रतिभा गायकवाड यांना अकलूज नगरपरिषद नगराध्यक्ष पदाचे उमेदवारी नाकरून आणि परवा पोलीस केस पडलेल्या लालासाहेब अडगाळे यांच्या धर्म पत्नीस नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहेत.





  अकलूज नगरपरिषद निवडणूक २०२५ 

प्रभागनिहाय अपात्र अर्ज ( बाद अर्ज ) प्रभाग १ मधून ४ उमेदवार, प्रभाग २ मधून २ उमेदवार, प्रभाग ३ मधून ५, प्रभाग ४ मधून ३, प्रभाग ५ मधून ३, प्रभाग ६ मधून ४, प्रभाग ७ मधून २, प्रभाग ८ मधुन २, प्रभाग ९ मधुन ५, प्रभाग १० मधुन ३, प्रभाग ११ मधून ५, प्रभाग १२ मधून ३, प्रभाग १३ मधून ४ उमेदवार.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा