Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ७ नोव्हेंबर, २०२५

पार्थ पवार यांनी चार वर्षात कमावलेलं उत्पन्न अखेर आलं समोर.. --कंपनीचं गोडबंगाल?

 संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:--  9730 867 448

पुणे-कोरेगाव पार्क परिसरातील ३०० कोटी रुपयांचा जमीन खरेदी-विक्रीच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या अमेडिया होल्डिंग्ज एलएलपी या कंपनीच्या आर्थिक नोंदींमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार या कंपनीचे भागीदार असून, या कंपनीने गेल्या चार वर्षांत व्यवसायातून एकही रुपया महसुली उत्पन्न मिळविले नसल्याचे कंपनी व्यवहार मंत्रालयाकडील कागदपत्रांनुसार उघड झाले आहे. याचबरोबर इतरही अनेक बाबी समोर आल्या आहेत.

कंपनी व्यवहार मंत्रालयाकडील नोंदींनुसार, या कंपनीची आर्थिक खाती अत्यंत अल्प व्यवहार दर्शवितात. कंपनीने आर्थिक वर्ष २०२१-२२ ते २०२४-२५ या काळात कोणत्याही व्यवसायातून उत्पन्न नोंदवलेले नाही. अर्थविषयक कामकाजात फक्त बँक शुल्क म्हणून ७०८ रुपये इतकीच रक्कम खर्च झाल्याचे दाखवण्यात आले आहे आणि तीच कंपनीच्या तोट्यात नोंदविण्यात आली आहे.

आर्थिक वर्ष २०२४-२५ अखेर पार्थ पवार आणि त्यांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील या दोन्ही भागधारकांची भांडवलाची एकूण रक्कम २ लाख ५७ हजार ५६८ रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पार्थ पवार यांच्या भांडवली खात्यात १.५८ लाख रुपयांची शिल्लक असल्याची नोंद आहे. या कंपनीकडे कोणतीही मालमत्ता नसून, एका खासगी बँकेत २ लाख ४७ हजार रुपये आणि १० हजार रुपये रोकड एवढाच निधी असल्याचा तपशील आहे.

या सर्व आर्थिक नोंदी ३० ऑक्टोबर २०२५ रोजी कंपनीने कंपनी व्यवहार मंत्रालयाकडे दाखल केलेल्या आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या लेखापरीक्षण अहवालात नमूद केल्या आहेत. हा अहवाल चार्टर्ड अकाउंटंट्स ए. व्ही. अय्यर अँड कंपनी यांच्यामार्फत सादर करण्यात आला आहे. मात्र, मंत्रालयाकडील नोंदींमध्ये अमेडिया कंपनीच्या स्थापनेची कागदपत्रे उपलब्ध नाहीत. त्यामुळे ही कंपनी नेमकी कशी आणि कधी स्थापित झाली, याबाबत शंका निर्माण होत आहे.

अनेक प्रश्न उपस्थित

एकीकडे जमीन व्यवहाराची कोट्यवधींची रक्कम आणि दुसरीकडे कंपनीकडे नसलेला महसूल, नगण्य भांडवल आणि मालमत्तेचा पूर्ण अभाव या परस्परविरोधी गोष्टी समोर आल्या आहेत. एवढ्या मोठ्या आर्थिक उलाढालीचा व्यवहार अशा निष्क्रिय कंपनीमार्फत कसा होऊ शकतो, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. माहिती तंत्रज्ञान कंपनी असे कागदोपत्री दाखवण्यात आलेले या कंपनीने आतापर्यंत काहीच काम केले नसल्याचे उघड होत आहे. त्यामुळे बेनामी व्यवहारांसाठी ही कंपनी स्थापन केली गेली का असाही मुद्दा आता उपस्थित झाला आहे. कोरेगाव पार्क परिसरातील ३०० कोटी रुपयांचा जमीन खरेदी-विक्रीच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या अमेडिया होल्डिंग्ज एलएलपी या कंपनीच्या आर्थिक नोंदींमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार या कंपनीचे भागीदार असून, या कंपनीने गेल्या चार वर्षांत व्यवसायातून एकही रुपया महसुली उत्पन्न मिळविले नसल्याचे कंपनी व्यवहार मंत्रालयाकडील कागदपत्रांनुसार उघड झाले आहे. याचबरोबर इतरही अनेक बाबी समोर आल्या आहेत.

कंपनी व्यवहार मंत्रालयाकडील नोंदींनुसार, या कंपनीची आर्थिक खाती अत्यंत अल्प व्यवहार दर्शवितात. कंपनीने आर्थिक वर्ष २०२१-२२ ते २०२४-२५ या काळात कोणत्याही व्यवसायातून उत्पन्न नोंदवलेले नाही. अर्थविषयक कामकाजात फक्त बँक शुल्क म्हणून ७०८ रुपये इतकीच रक्कम खर्च झाल्याचे दाखवण्यात आले आहे आणि तीच कंपनीच्या तोट्यात नोंदविण्यात आली आहे.

आर्थिक वर्ष २०२४-२५ अखेर पार्थ पवार आणि त्यांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील या दोन्ही भागधारकांची भांडवलाची एकूण रक्कम २ लाख ५७ हजार ५६८ रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पार्थ पवार यांच्या भांडवली खात्यात १.५८ लाख रुपयांची शिल्लक असल्याची नोंद आहे. या कंपनीकडे कोणतीही मालमत्ता नसून, एका खासगी बँकेत २ लाख ४७ हजार रुपये आणि १० हजार रुपये रोकड एवढाच निधी असल्याचा तपशील आहे.

या सर्व आर्थिक नोंदी ३० ऑक्टोबर २०२५ रोजी कंपनीने कंपनी व्यवहार मंत्रालयाकडे दाखल केलेल्या आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या लेखापरीक्षण अहवालात नमूद केल्या आहेत. हा अहवाल चार्टर्ड अकाउंटंट्स ए. व्ही. अय्यर अँड कंपनी यांच्यामार्फत सादर करण्यात आला आहे. मात्र, मंत्रालयाकडील नोंदींमध्ये अमेडिया कंपनीच्या स्थापनेची कागदपत्रे उपलब्ध नाहीत. त्यामुळे ही कंपनी नेमकी कशी आणि कधी स्थापित झाली, याबाबत शंका निर्माण होत आहे.

अनेक प्रश्न उपस्थित

एकीकडे जमीन व्यवहाराची कोट्यवधींची रक्कम आणि दुसरीकडे कंपनीकडे नसलेला महसूल, नगण्य भांडवल आणि मालमत्तेचा पूर्ण अभाव या परस्परविरोधी गोष्टी समोर आल्या आहेत. एवढ्या मोठ्या आर्थिक उलाढालीचा व्यवहार अशा निष्क्रिय कंपनीमार्फत कसा होऊ शकतो, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. माहिती तंत्रज्ञान कंपनी असे कागदोपत्री दाखवण्यात आलेले या कंपनीने आतापर्यंत काहीच काम केले नसल्याचे उघड होत आहे. त्यामुळे बेनामी व्यवहारांसाठी ही कंपनी स्थापन केली गेली का असाही मुद्दा आता उपस्थित झाला आहे.

-----------------------------------------------------------------------

--

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा