संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
माळशिरस तालुका काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक अकलूज येथे पक्ष कार्यालयात संपन्न झाली. बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी संदर्भात बूथ लेवल एजंट ,बुथ कमिट्या, जिल्हा परिषद ,पंचायत समिती गण -गटांत प्रभारी यांच्या नेमणुका करणे,नगरपरिषद, जिल्हा परिषद ,पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवाराचे फॉर्म भरणे व मुलाखती संदर्भात चर्चा करण्यात आली.
आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असून पारंपारिक मतदार व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव ही निवडणूक लढून जिंकणार असल्याचे मत सोलापूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.सातलिंग शटगार यांनी मांडले.
आपल्या मार्गदर्शनात तालुकाध्यक्ष गिरीश शेटे म्हणाले काँग्रेस पक्षाच्या आदेशाप्रमाणे तालुक्यात पक्षाची बांधणी करून आगामी निवडणुकीसाठी सामोरे जाणार असून पक्ष देईल त्या आदेश आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवणार असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब मगर, राजाभाऊ गायकवाड, संभाजी साठे, संतोष कांबळे, डॉ.उदयसिंह पवार, राजेंद्र डोंबे, हिरालाल मोरे, भाग्यवंत नायकुडे, मुन्ना शेख, अविनाश जगताप, अनिकेत खंडागळे, सुभाष सरतापे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
___________________________________________________





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा