*सहसंपादक- डॉ. संदेश शहा*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9922 419 159*
रयत शिक्षण संस्थेच्या इंदापूर येथील सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व जुनिअर कॉलेज मधील इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी धनश्री अर्जुन खरात हिची राज्यस्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेसाठी निवड झाली.
क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद पुणे व महाराष्ट्र राज्य ज्युदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी या ठिकाणी विभागीय स्पर्धा संपन्न झाल्या.
या स्पर्धेत धनश्रीने सतरा वर्षाखालील ४० किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे बालेवाडी या ठिकाणी होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. धनश्रीला क्रीडा शिक्षक सुनिल मोहिते व ज्युदो प्रशिक्षक अमोल शहाणे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यालयाचे प्राचार्य संजयकुमार शिंगारे, पर्यवेक्षिका पुष्पा काळे, शाळा समिती, शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ, माता पालक संघ, माजी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
---------------------------------------------------------------------+--






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा