Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १० नोव्हेंबर, २०२५

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पंचायत समिती गणा मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून मंदाकिनी शिवाजी सावंत निवडणुकीसाठी इच्छुक-- पक्षाकडे केली मागणी

 मुख्यसंपादक -- हुसेन मुलाणी.   टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:--  9730 867 448


तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पंचायत समिती गणामधून राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवारसाहेब पक्षाकडून माजी सैनिक  सावंत शिवाजी रामकृष्ण यांच्या पत्नी श्रीमती मंदाकिनी शिवाजी सावंत या महाविकास आघाडी मधून इच्छुक पक्षाकडे अधिकृतपणे मागणी आहे 

आगामी होणाऱ्या पंचायत समिती तुळजापूर मधील तामलवाडी गणामधून  तामलवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारसाहेब पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते तथा माजी सैनिक सावंत शिवाजी रामकृष्ण यांच्या पत्नी श्रीमती मंदाकिनी शिवाजी सावंत या महाविकास आघाडी मधून इच्छुक असून त्यांनी पक्षाकडे अधिकृतपणे मागणी केली आहे त्यांनी आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून कोरोना काळात महिलाना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी हाताला उद्योग म्हणून पापड उद्योग निर्माण केला होता, गरीब माता व महिलाना रोज स्वयंपाक करत असताना चुली पासून निर्माण होणाऱ्या धुरापासून मुक्तता करण्यासाठी शासकीय योजनेअंतर्गत त्यांच्या आशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून मोफत शेकडो गॅस व शेगडीचे वाटप करून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे, कोरोना काळात बँकाद्वारे महिला बचत गटाच्या सक्तीची कर्ज वसुली थांबवण्याकरिता प्रयत्न केले, तामलवाडी येथे दारूबंदी करण्याकरता प्रयत्न केले होता, त्यांच्या पतिनी शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळावे याकरिता बँकांसमोर आंदोलन केले होते, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्यात यावी याची मागणी त्यांनी शासनाकडे केली, पल्स गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळण्याकरिता भारत सरकारकडून यशस्वी प्रयत्न केले, त्यांचे पती व त्याचे सहकारी यांनी कटारे स्पिनिंग मिल कामगारांच्या १३ - १४ वर्षे नमिळालेल्या ग्रॅज्युटी मिळवून देण्याकरिता करण्यात आलेल्या आंदोलन यशस्वी केले, शेतकऱ्याकरिता तामलवाडी, पिंपळा खुर्द, पिंपळा बुद्रुक, सांगवी (काटी) व सुरतगाव येथील अनेक ठिकाणच्या शेतीतील व गावातील पाण्याकरिता नवीन लाईटचे डी पी बसवून घेतले, नवीन पोल मिळवून देण्याकरिता यशस्वी प्रयत्न केले, गोंधळवाडी~पिंपळा खुर्द ~पिंपळा बुद्रुक ~देवकुरुळी ~धोत्री ~खडकी या प्रधानमंत्री सडक योजनेतील अपहार उघडकेस आणून ठेकेदाराकडून रस्ता नवीन डांबरीकरण व पिंपळा खुर्द येथे रस्त्याचे सीमेटीकरण करून घेतले, पिंपळा खुर्द येथील राशन दुकानाचा प्रश्न सोडवला, संजय गांधी निराधार योजना व इंदिरा गांधी पेन्शन योजनेमधून महिलांना त्यांच्या पेन्शन योजनेचा लाभ मिळवून देण्याकरिता प्रयत्न केले, परिसरातील अनेक पती-पत्नी यांचे कौटुंबिक भांडणे सामोपचाराने पोलीस स्टेशनमध्ये न जाऊ देता यशस्वीपणे सोडवून त्यांचे संसार सुखाचे बनवले, त्याचबरोबर मागील अडीच वर्षापासून तामलवाडी ग्रामपंचायत हद्दीतील बहुचर्चित औद्योगिक कंपन्याकरिता भांडवली मूल्याच्या आधारित कर वसुली आंदोलनाच्या संघर्षाच्या काळात त्यांनी त्यांच्या पतीकरिता खूप प्रोत्साहन व खंबीर साथ दिली आहे, सावंत दांपत्य यांचा तामलवाडी गणामध्ये दांडगा संपर्क असून त्यांची संघर्षातील नेतृत्व म्हणून ओळख आहे, सध्या त्यांनी इच्छुक असतानाच गावभेटीचा धडाका व जनसंपर्क भेटीगाठी चालू केला आहे, त्यामुळे येणारी पंचायत समिती निवडणूक अत्यंत चुरशीची होणार हे आता निश्चित झाले आहे तसेच श्रीमती मंदाकिनी शिवाजी सावंत यांना तिकीट मिळणार का ? कोणाचे तिकीट कट होणार ? सावंत दांपत्य यांना जनाधार आहे अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे मग पक्षश्रेष्ठी निष्ठावंत असलेल्या श्रीमती मंदाकिनी शिवाजी सावंत यांना तारणार की डावलणार?  व डावल्यावर त्यांची काय भूमिका असेल या सर्वांकडे पंचकर्षिचे लक्ष वेधले आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा