Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २७ नोव्हेंबर, २०२५

संविधान दिनानिमित्त बावडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून संविधान उदृदेशिकेचे सामुदायिक वाचन

 *कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147*


----- संविधान दिनानिमित्त बावडा प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात पुतळ्याचे पूजन करून संविधान उदृदेशिकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले. तसेच लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.

    संविधान दिनाचे औचित्य साधक बावडा नरसिंह पूर परिसरामध्ये ७५ वा अमृत महोत्सवी संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका राणी करडे मॅडम, शिक्षिका सोनाली साळुंखे मॅडम, अखिल कांबळे, विशाल कांबळे, गणेश कांबळे, सुयश कांबळे यांनी मुलांना खाऊ वाटप केला. तर डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास समस्त नवबौद्ध समाज बांधवांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून संविधान उदृदेशिकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले.


    त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्र बावडा येथे डॉ. ताटे, डॉ. भाहेगावकर, ईश्वर कट्टी, सचिन जाधव, चोरमले, ओंकार जगदाळे, म्हसवडकर, वैशाली कांबळे, मोरे शिष्टर, काळे शिष्टर, स्वाती शिंदे, मनिषा जाधव, टेके आदिंनी उपस्थित रहात संविधान उद्देशिकेचे सामुदायिक वाचन केले.

   तसेच ग्रामपंचायत नरसिंहपूर, टणू, गिरवी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्येही ७५ वा अमृत महोत्सवी संविधान दिन साजरा करण्यात आला. तसेच २६/११ मधिल शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

फोटो - बावडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संविधान दिन साजरा करण्यात आला.

---------------------------





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा