सहसंपादक --संदेश शहा
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:--9922 419159
मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथे पार पडलेल्या साऊथ - वेस्ट झोन आंतरविद्यापीठ ज्युदो स्पर्धेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर कडून खेळताना इंदापूर ( जिल्हा पुणे ) येथील सुवर्णकन्या श्रावणी शिताप या श्री छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज च्या विद्यार्थिनीने ५२ किलो वजन गटात गोल्ड मेडल पटकावून इंदापूरच्या नावलौकिकात भर घातली. अमृतसर येथे होणाऱ्या राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. राज्याचे विद्यमान कृषी मंत्री तथा माजी क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी श्रावणी च्या या यशा बद्दल तिचे अभिनंदन करून तिला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
श्रावणी ही इंदापूर येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत शिताप यांची कन्या असून इंदापूर ज्युडो कराटे असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय व्यवहारे सर हे तिचे गुरु आहेत.
मागील वर्षी कुराश मध्ये श्री. व्यवहारे सरांच्या मार्गदर्शनाखाली तिने २ राष्ट्रीय मेडल मिळवले होते. सध्या ती स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया गोवा येथे सराव करत असून कोच कुलविंदर कौर मॅडम या तिला प्रशिक्षण देत आहेत.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा