Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २० नोव्हेंबर, २०२५

शिवसेनेच्या उपनेत्या- सुषमा अंधारे यांचा खळबळजनक दावा --अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात 'शीतयुद्ध'.....

 संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:--  9730 867 448



राज्याच्या राजकारणात सध्या पडद्यामागे मोठ्या घडामोडी आणि हेवेदावे सुरु आहेत. महायुतीत सध्याच्या घडीला सारं काही आलबेल नाही, हे अनेक प्रकारावरुन समोर आले आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही उमेदवारी देण्यावरून आणि पक्षप्रवेशावरून नाराजी समोर आली होती. त्यामुळे नाराज शिंदे काल थेट दिल्लीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला गेले होते.   

याबाबत बोलताना सुषमा अंधारे यांनी खळबळजनक दावा केला आहे. "अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील कोल्डवॉर आता लपून राहिलेले नाही. त्यामुळेच महाराष्ट्रात अमित शाह यांच्या जवळचा जो असतो तो देवेंद्र फडणवीस यांच्या कायम रडारवर असतो. तसेच जो देवेंद्र फडणवीस यांच्या रडारवर असतो तो अमित शाह यांना अधिक प्रिय असतो. त्यामुळेच रवींद्र चव्हाण यांनी आमची माणसं फोडली असतील तर याची दाद कुणाकडे मागायची म्हणून कदाचित एकनाथ शिंदे त्यांच्याकडे गेले असतील", असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.     

एकनाथ शिंदेंना बीजेपीसोबत घेऊन सरकार स्थापन करण्यात सर्वात मोठी मदत अमित शाह यांनीच केली असून, या संपूर्ण राजकीय घडामोडींचे ते खरे शिल्पकार असल्याचा ठाम दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे.

अंधारे म्हणाल्या, "एकनाथ शिंदेंचे एकमेव ‘तारणहार’ आणि ‘मसिहा’ म्हणजे अमित शाह. त्यांच्या शिवाय शिंदेंचं म्हणणं कोणी ऐकून घेणार नाही, याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. त्याचबरोबर, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सुरू असलेल्या कोल्डवॉरचीही त्यांना जाणीव आहे. या सत्तासंतुलनाच्या संघर्षात आपल्याला निश्चित मदत करू शकणारा नेता म्हणजे अमित शाह, अशी शिंदेंची धारणा आहे. आणि म्हणूनच ते दिल्ली दरबारी आपली व्यथा मांडण्यासाठी गेले."





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा