Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ३० डिसेंबर, २०२५

*कारी ता. बार्शी येथील शाळेत सन 2003/04 च्या दहावी बॅचच्या विद्यार्थी ,विद्यार्थिनी यांचा गुरु- शिष्य भेट कार्यक्रम संपन्न*

 *संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी**

*मो:--  9730 867 448*



दि. 28 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा कारी, ता.बार्शी येथे श्री.शिवाजी विद्यालय व प्रमिला माणिकराव देशमुख विद्यालय कारी ता.बार्शी यांच्या संयुक्त विद्यामाने सन 2003-04 च्या इयत्ता दहावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा गुरु -शिष्य भेट हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भगवान हरिदास गुरुजी तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक भराडे गुरुजी,ज्ञानदेव करळे गुरुजी, खरटमल गुरुजी, कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी चे सभापती विजय गरड,विद्यालयाचे माजी मु. अ.महावीर भुसारे, आगलावे सर, सोनवणे सर, ढेबरे सर,गजानन देशपांडे, गाढवे सर, केळे सर,अनिल जोशी, जहांगीर सर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका क्षीरसागर मॅडम,सहशिक्षक कदम सर 2003-04 चे माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. विद्यार्थी यांनी मनोगत व्यक्त करताना मागील शालेय आठवणीला उजाळा दिला व शिक्षकांच्या कर्तृत्वामुळे कसे घडलो याचे महत्त्व सांगितले. शिक्षकांचे आयुष्यामध्ये किती महत्त्वाचे स्थान आहे            

                    --------:  जाहिरात :--------👇

  हे सर्व विद्यार्थ्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झाले. त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून गुरुवर्य शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी या आयुष्यामध्ये येणाऱ्या संकटात सामना करताना मित्राचे स्थान किती महत्त्वाचे आहे हे सर्व विद्यार्थ्यांना सांगितले. सुखदुःखामध्ये मैत्री कामाला येते.त्याचप्रमाणे आपण एखाद्या समस्येला तोंड देत असाल तर मैत्री त्यात कशी उपयोगी पडते असे विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून मार्गदर्शन केले. एखादा मित्र जर आर्थिक, सामाजिक परिस्थितीतून त्याची परिस्थिती ढासळत असेल तर सर्व मित्रांनी मिळून त्याला आधार द्यावा असे महत्त्वपूर्ण विचार या सर्व मान्यवरांनी  सांगितले. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिदास गुरुजी यांनी या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गुरूच्या प्रती केलेल्या भावना तसेच गुरुचे आपण केलेले सत्कार, मान सन्मान दिला त्याबद्दल विद्यार्थ्यांचे आभार मानले व विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यामध्ये आपण अशीच प्रगती करावी, आपल्या आई-वडिलांचे नाव कमवावे व आपली मैत्री टिकवावी असे महत्त्वपूर्ण विचार आपल्या भाषणातून व्यक्त केले. सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेला एक शालेय उपयोगी लोखंडी कपाट भेट म्हणून देण्यात आले, तसेच माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्यात आला. माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी अमिन मुलाणी यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप चव्हाण यांनी तर शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अमिन मुलाणी यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा