Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ३० डिसेंबर, २०२५

*माजी आमदार संजयमामा शिंदे पराभवाची हॅट्रीक पुर्ण करणार... आ.नारायण आबा पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर यांचा दावा*

 *करमाळा-- प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी कितीही प्रयत्न  केले तरी येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत त्यांना पराभवालाच सामोरे जावे लागणार असून विधानसभा व आदिनाथ पाठोपाठ याही निवडणुकीत आपल्या एकाही कार्यकर्त्यांना निवडून आणू शकणार नाहीत. सलग तीन निवडणुकीत पराभुत होऊन नंतरच ते करमाळा तालुक्यातील राजकारणातून काढता पाय घेतील असा हल्लाबोल पाटील गटाकडून करण्यात आला. सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची पुर्व तयारी म्हणुन माजी आमदार संजयमामा शिंदे हे करमाळा तालुक्यातील गावांना भेटी देत असून गट व गणानुसार उमेदवार चाचपणी करत आहेत.               


     यावर आमदार नारायण आबा पाटील गटाकडून टिका करण्यात आली. यावेळी सविस्तर बोलताना पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर म्हणाले की माजी आमदार संजयमामा शिंदे हे सन २०१४ च्या पुर्वीपासून करमाळा तालुक्यातील राजकारणात सक्रीय आहेत. दहा वर्षे उलटुन गेली तरी त्यांना करमाळा तालुक्यातील "तालूकापातळी वरील निवडणुकीत" त्यांना स्वतःच्या एकाही कार्यकर्त्याला निवडुन आणता आले नाही ही बाब खरी आहे. स्वतः शिवाय त्यांचेकडे इतरांना निवडून आणता येण्याची धमक नाही हे आता अधोरेखित झाले आहे. त्यांनी कितीही आदळआपट केली तरी येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही शिंदे गटाचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. माढा पॅटर्न आता बुडीत निघाला असून पैशाच्या व बोगस मतांच्या बळावर निवडणुक जिंकायचा त्यांचा डाव करमाळा तालुक्यातील सर्व सामान्य जनतेने आता पुरता ओळखला आहे. यामुळेच आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत ते स्वतः उमेदवार असतानाही त्यांचा पुर्ण पॅनल भुईसपाट झाला. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही याचीच पुनरावृत्ती होणार आहे.                   

                      ---------: जाहिरात:--------👇


 विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांच्या वर या तालुक्यातील जनतेचा विश्वास कायम असल्याचे सलग दोन विधानसभा निवडणुकीतील करमाळा तालुक्यातील मिळालेल्या मतांच्या आकडेवारी वरुन सिध्द होत आहे. माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या पाच वर्षाच्या काळात करमाळा तालुक्यातील जनतेने सर्वोच्च पातळीवरील हाल अपेष्टा सोसल्या आहेत. इथल्या सर्वच राजकीय गटांना निष्क्रिय दाखवण्याच्या त्यांच्या मानसिकते मुळेच आदिनाथ व नगरपालिका निवडणुकीत शिंदे गटाबरोबर युती करायला कोणी तयार झाले नाही. 'अग अग म्हशी मला कुठ नेशी' असं बळेच म्हणंत माजी आमदार संजयमामा शिंदे हे राष्ट्रवादी बरोबर आपण असल्याचे दाखवत आहेत. पण याचा काही उपयोग होणार नसून आगामी विधानसभा निवडणुकी पर्यंत आपला गट टिकून रहावा या एका उद्देशाने ते जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक लढवू पाहत असून ही निवडणुक म्हणजे विधानसभा निवडणुकीत किमान पोलींग एजंट तरी असावेत या हेतूने केलेला एक असफल प्रयत्न माजी आमदार संजयमामा शिंदे करत असल्याचा टोला तळेकर यांनी लगावला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा