Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ३० डिसेंबर, २०२५

शिवसेनेला मतदान केल्यास स्वर्गातलं स्थान निश्चित', -- शहाजी बापू पाटील, यांचं वक्तव्य --भाजपला आता मुंडे-महाजन नकोत';

 *संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी**

*मो:--  9730 867 448*



महापालिका निवडणूक : महाराष्ट्रात १५ जानेवारी २०२६ ला मुंबईसह २९ महापालिकांची निवडणूक पार पडणार आहे. या दृष्टीने वातावर आता तापू लागलं आहे. विविध वक्तव्यं आणि आरोप प्रत्यारोप समोर येणार आहेत. आजचा दिवसही त्याला अपवाद ठरला नाही.

शिवसेनेला मतदान केल्यानंतर तुम्ही स्वर्गात जाणार असं शहाजीबापू पाटील म्हणाले. तर मुंडे महाजनांची भाजपला गरज राहिलेली नाही असं प्रकाश महाजन यांनी म्हटलंय. आपण जाणून घेऊन दिवसभरातली पाच वक्तव्यं

                          -----: जाहिरात :-----👇


शिवसेनेला मतदान केल्यावर तुम्ही स्वर्गात जाणार-शहाजीबापू पाटील

सांगोला येथे आयोजित एका राजकीय सभेत आमदार शहाजीबापू पाटील यांनी एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चर्चांना उधाण आले आहे. शहाजीबापू पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हाला मतदान करणार्‍यांना स्वर्गात निश्चितपणे जागा मिळेल. त्यांच्या मते, ज्यांनी शिवसेनेला मत दिले आहे, त्यांना देव कधीही नरकात घेणार नाही, उलट स्वर्गातच त्यांचे स्थान निश्चित आहे. "तुम्ही विजयी झाला असाल, पण मी खात्रीने सांगतो की ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाण लावला, त्यांना स्वर्गातच उद्या जागा आहे. नरकात तुम्हाला देव घेत नाही," असे पाटील यांनी सांगोल्याच्या सभेत उपस्थितांना उद्देशून म्हटले. हे वक्तव्य देताना त्यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावरही टीका केली.

वर्षा गायकवाड वंचितच्या आघाडीबाबत काय म्हणाल्या?

“महाराष्ट्रात आपण आजचं राजकारण पाहता, जात, धर्म, प्रांत, भाषा यावरून वाद न करता जे राजकारण असेल ते पुरोगामी आणि प्रगत महाराष्ट्रासाठी राजकारण असेल. त्याची सुरूवात आम्ही मुंबईमधून करत आहोत, तसेच याची सुरूवात मुंबईतून झाली आहे हे आमचं भाग्य आहे”, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत. तुम्ही नाराज आहात का? जेव्हा काँग्रेस आणि वंचितची युती जाहीर झाली तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी नव्हता. असा प्रश्न विचारण्यात आला असता वर्षा गायकवाड म्हणाल्या की, “मी कशाबद्दल नाराज असेल? युतीसाठी मी स्वत: त्यांना साद घातली होती. एक छोटी बहीण म्हणून मी त्यांना युतीसाठी आवाहन केलं होतं. त्यांनी देखील माझी विनंती मान्य केली. मी त्यांचे जाहीरपणे आभार मानते. मला या गोष्टीचा आनंद आहे की महाविकास आघाडी मागे केली, आता आमची वंचितबरोबर आघाडी झाली.” “या आघाडीच्या माध्यमातून आम्ही धर्माचं, जातीचं, भाषेचं बोलत नाहीत तर संविधान आणि मुंबईकरांच्या प्रश्नांबाबत बोलत आहोत. आम्ही सर्वांना जोडण्याची भाषा करत आहोत, आम्ही संविधानाची भाषा करत आहोत, आम्ही लोकशाहीची भाषा करत आहोत. मग अशावेळी जर काँग्रेसबरोबर वंचित आघाडी आली तर असेल तर मला खूप आनंद आहे” असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

दिनकर पाटील म्हणाले १ लाख टक्के निवडून येणारच

मनसेमधून भारतीय जनता पार्टीमध्ये (भाजप) प्रवेश केलेले दिनकर पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील सदस्यही उपस्थित होते. दिनकर पाटील यांनी स्वतःसह त्यांची बहीण भारती देवरे, संगीता घोटेकर, अमोल पाटील आणि लता पाटील यांचे उमेदवारी अर्ज भरल्याची माहिती दिली. जनतेचा आपल्याला मोठा पाठिंबा मिळत असून, पक्षप्रवेशापासून घेतलेल्या मेळाव्यांना व सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे पाटील यांनी सांगितले. "आम्ही निवडणुकीपुरते समोर येत नाही, तर बाराही महिने जनतेमध्ये असतो आणि जनतेचे काम करत असतो," असे ते म्हणाले. 1992 पासून जनता आमच्यावर विश्वास ठेवत असल्याने विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नुकत्याच झालेल्या एका जनसभेतील जनतेचा उत्साह पाहून आपण भावुक झालो होतो, कारण भाजपमध्ये आल्यावर खूप आनंद झाल्याचे आणि लोक खूप खुश असल्याने अश्रू आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दिनकर पाटलांनी विजयाची "एक लाख टक्के" खात्री व्यक्त केली आहे.

विठ्ठलाच्या नातवाचं काम करायचं का?

मोठ्या लोकांनी निष्ठा बदलली की विचार, देशहित असे बोलले जाते, गरिबांनी केले की शेण खाल्ले म्हणतात. विठ्ठल बदलणार नाही म्हणाला होतात, मी कधीही विठ्ठल बदलला असता तर मला हाच प्रश्न केला असता. मी तीन महिने वाट पाहिली, मलाही हिंदुत्वावर काम करायचे होते. पाच वर्ष मनसेत होतो, तपश्चर्या केली. राजीनामा दिल्यावर तीन महिने वाट पाहिली, असे म्हणत प्रकाश महाजन यांनी आपल्या पक्षप्रवेशावर भाष्य केलं. तसेच, पैशामुळे महाजनांनी पक्ष सोडला म्हणतात, जे लोक असे प्रश्न विचारतात ते जनावरांच्या बाजारात दलाली करतात, असे महाजन यांनी म्हटले. आमच्यावर विठ्ठलाचे प्रेम नव्हते, विठ्ठलाच्या नातवाचे काम करायचे. मी म्हणलो होतो विठ्ठल बदलणार नाही, पण विठ्ठलाने लक्ष दिले पाहिजे नाही का? असे म्हणत प्रकाश महाजन यांनी थेट नाव न घेता राज ठाकरेंवर हल्लाबोल केला.

पुण्यात मनसे आणि काँग्रेस एकत्र येणार का?

आमच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास ठरला आहे. जे घटक पक्ष आहेत म्हणजे जसं की रासप आहे किंवा मनसे आहे तर आमच्या स्तरावर आमची चर्चा सुरु आहे. आज संध्याकाळपर्यंत निर्णय होईल. विरोधातले पक्ष हे भाजपच्या विरोधात आमच्याबरोबर आहेत असं सचिन अहिर म्हणाले तर दर आठवड्याला कॅबिनेटला एकत्र बसणारे जर वेगळे लढत असतील तर आम्ही तर विरोधात आहोत. आमच्या भूमिका विरोधातच असणार ना असा प्रश्न सतेज पाटील यांनी विचारला. तसंच आमचा उद्देश भाजपाला सत्तेपासून बाजूला ठेवणं हा आहे असंही सतेज पाटील म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा