Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ७ डिसेंबर, २०२५

"उमराह यात्रा भिशी"चा ट्रेंड यशस्वी!... बिनव्याजी पैशातून 72000 रुपयात "हर घर हाजी" होण्याचे पुण्य!!...

 इक्बाल बाबासाहेब मुल्ला -(पत्रकार)

सांगली ---मो:--8983 587 160



थेंबे - थेंबे  "तळे" साचे आणि पैशाला पाय असतात हे रूढ वाक्य "प्रचलित" आहे. !"पैसे"  असल्यास चैनीच्या वस्तू अथवा अन्य महाग वस्तू आपण खरेदी. करतो हे "वास्तव" आहे.परंतु प्रत्येक आठवड्यात आपण त्याच पैशाची बचत केल्यास वर्षाअखेरीस "मोठी रक्कम" आपणास दिसते. याच चौकटीतील हरघर हाजी  होण्याचा नवीन "ट्रेंड" प्रत्येक घरातील,प्रत्येक व्यक्तीस "उमराह ची पवित्र यात्रा घडवून आणू शकतो.      

    *उमराह भिशीचा ट्रेंड यशस्वी !*

सांगलीतील एस.टी.स्टॅन्ड मागे चांदतारा मस्जिद  च्या जवळ तेथील जबाबदार- प्रामाणिक आणि नामवंत असणाऱ्या काही व्यक्तींनी पुढाकार घेत, समाजातील प्रत्येक व्यक्तींनी   हज - उमराह यात्रा करावी, उदात्त उद्देशाने बिनव्याजी.   "उमराह भिशी" सुरु केली. इच्छुक व्यक्तींनी प्रत्येक आठवड्याला 1500  रुपये द्यायचे त्याचे महिन्याला 6000 रुपये जमतात. अशाप्रकारे 12 महिन्यात 72000. पेक्षा जास्त रक्कम जमली जाते. उमराह साठी कमीत कमी 72000 रुपये घेणारे काही टूर्स & ट्रॅव्हल्स  उपलब्ध आहेत. त्या माध्यमातून यंदा 2025 मध्ये  17 लोकांनी  उमराह साठी "प्रस्थान"  केले. ज्यांना मोठ्या "पॅकेज"मधून जायचे असेल ते अतिरिक्त पैसे देऊन "उमराह" ला जाऊ शकतात.


"उमराह भिशी" ही एक छोटीशी "संकल्पना" आहे परंतु त्याचा फायदा व "पुण्य" मोठे  आहे .अशा  छोट्या - छोट्या गोष्टी समाजाच्या व्यासपीठावर  कधीच येत नसतात. कित्येक भाविक - इच्छुक या पुण्यकार्यापासून वंचित राहतात. तरीही 72000 रुपयात उमराह  होत असेल तर त्यात गैर.व नुकसान काय ??

हा स्तुत उपक्रम आणि नाविन्यपूर्ण संकल्पना सर्व मुस्लिमांना. माहित व्हावी या दृष्टीकोनातून या "लेखाचे प्रयोजन" आहे.                 

 आशीर्वाद घ्या आणि उमराह भिशी चा ट्रेंड प्रत्येक शहरात राबवा !

आपण स्वतः  एखाद्याला उमराहला जाण्यासाठी पैसे देऊ शकत नसेन किंबहुना ते पुण्य. मिळवू शकत नसेल पण या "उमराह भिशी" च्या माध्यमातून निश्चितपणे 100% उमराह चे पुण्य स्वतः मिळवू शकतो. ज्यांना यात सामील करायचे त्यांनी 12 महिन्यानंतर उमराह ला जायचे, पासपोर्ट - प्रकृती अस्वस्थ असेल अथवा काही अडचण असेल  तर "घरातीलच" एखादी व्यक्ती उमराह ला जाणार हा नियम. असावा.पैसे कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाहीत. असे नियम बनवून प्रामाणिक - जबाबदार - नामवंत व्यक्तींनी पुढाकार घ्यावा.स्वतः  पूण्य मिळवावे आणि दुसऱ्यांना पण "हाजी व पुण्यवान"  बनवावे. भविष्यात प्रत्येक शहरात अशी "संकल्पना"  "समंजस" - जबाबदार  सामाजिक कार्यकर्त्यांनी  राबवल्यास संपूर्ण शहर. हाजी होईल यात तिळमात्र शंका असणार नाही.मात्र जवाबदार प्रामाणिक आणि नामवंत पुढाकार घेणारे व्यक्तीची इच्छाशक्ती प्रामाणिक असावी एवढेच....


. इकबाल  बाबासाहेब मुल्ला

( पत्रकार)

संपादक - सांगली वेध संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.मोबाईल - 8983587160

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा