अकलूज--- प्रतिनिधी
शकुरभाई - तांबोळी
टाइम्स 45 न्यूज मराठी
दिनांक 6 /12/ 2025 रोजी लक्ष्मीबाई कन्या प्रशाला, यशवंतनगर या प्रशालेचे महर्षि महोस्तव -२०२५ , वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
याप्रसंगी, प्रमुख पाहुणे म्हणून . अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ ,अकलूज संचालिका कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील उपस्थित होते प्रारंभी या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते
जाहिरात 👇
माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षि कै.शंकरराव मोहिते पाटील व स्व.रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन, नटराजाच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .सदर प्रसंगी मनोगत व्यक्त करताना पोलीस निरीक्षक निरज उबाळे म्हणाले की, आजच्या सोशल मीडियाचा जमान्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून ते पूर्णत्वाला नेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून आपले व्यक्तिमत्व घडविले पाहिजे.पुढे बोलताना त्यांनी शिक्षणातून संस्कारक्षम पिढी तयार होत असते .त्यामुळे विद्यार्थिनींनी शालेय जीवनामध्ये संस्कारक्षम शिक्षण घेऊन आपल्या जीवनाची वाटचाल केली पाहिजे ,आणि दृष्ट प्रवृत्ती पासून दूर राहण्याचा प्रयत्न करणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले
कार्यक्रमाच्या अध्यक्षा .कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील होत्या(संचालिका शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज,तथा सभापती लक्ष्मीबाई कन्या प्रशाला यशवंतनगर,) यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करत असताना म्हणाल्या की आपल्या अंगभूत कलागुणांचा विकास झाला पाहिजे सर्व क्षेत्रांमध्ये आपण सक्षमपणे स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे ,तुमचे विचार तुमचे जीवन घडवतात , जीवनात संघर्ष करण्यासाठी तत्पर राहीले पाहिजे .इतर कोणी तरी माझ्या मदतीला येईल असा विचार न करीत मीही या संघर्षाचा सामना करुं शकते हा सकारात्मक विचार केला पाहिजे व जीवनाची वाटचाल केली पाहिजे मुलींनी परावलंबी जीवन जगण्यापेक्षा स्वावलंबी जीवन जगण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. माझा विचार माझी जबाबदारी या पद्धतीने पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थिनींचा कलागुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विविध स्पर्धेत भाग घेऊन स्वतःचे व्यक्तिमत्व घडवले पाहिजे महिलांनी व मुलींनी जीवनाला सामोरे जाताना समायोजनाची तयारी ठेवून सर्व समावेशक पद्धतीने आपली वाटचाल असावी .विद्यार्थिनींनी या महर्षि महोत्सवात आपली कला सादर करुन आनंद साजरा केला .
कार्यक्रमासाठी उपस्थित महिला पालक वर्ग यांनी सुद्धा सामी -सामी गाण्याच्या ठेक्यावर नृत्याचा आनंद घेतला .
कार्यक्रमासाठी प्रशाला समिती सदस्य ॲड . नितीन खराडे, नवनाथ पांढरे, अकलूज पोलीस स्टेशन चे शिवकुमार मदभावी मुख्याध्यापक संजय गळीतकर,मुख्याध्यापिका वाघ मॅडम, मुख्याध्यापक शिवाजी पारसे सर,परीक्षक प्रताप थोरात व धीरज गुरव उपस्थित होते,कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका अनिता पवार व सूत्रसंचालन कोळी सर यांनी केले.कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले
-----------------------------******-----------------------------------







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा