इक्बाल बाबासाहेब मुल्ला( पत्रकार) सांगली --मो:-8983 587 160
"तलाकशुदा" पुरुषाला "बायको" हवी आहे, पण बिन मुलांची तलाक झालेल्या अथवा विधवा असणाऱ्या प्रत्येक तरुणीला 1-2 मुले आहेत,त्या लहान मुलांनी. आईला सोडून कुठे जायचे ?? मुले नको ही अपेक्षा असणाऱ्या पुरुषांना लहान मुलांची ताटातूट करून काय "समाधान" मिळणार आहे ?? या लहान मुलांचा काय दोष ??? आज तलाक झालेल्या किंवा विधवा झालेल्या हजारो तरुणी खितपत. पडल्या आहेत परंतु समाजाचे किंवा समाजातील जेष्ठांचे लक्ष नाही.अनेक तलाक झालेल्या तरुणी "पडेल" ते कामं करून आपल्या मुलांचा सांभाळ करतात ,उदरनिर्वा
ह करतात .परंतु जेंव्हा त्यांच्या विवाहाचा प्रश्न उपस्थित होतो तेंव्हा पुरुष फक्त "एकट्याच" स्त्री ची मागणी करतो. पुरुषाला केवळ उपभोगण्यासाठी स्त्री हवी आहे का ?? तिच्यासोबत असणाऱ्या "मुलांचे" भवितव्य काय ?? मुलाचे आजोबा -आज्जी किती दिवस जगणार ?? सांभाळणार ???
सर्वसाधारणपणे तलाक झाल्यावर बहुतांशी मुले ही "आईकडेच" असतात, जगात केवळ आईच मुलांना "प्रेम" देऊ शकते (पुरुष ही मुलांवर प्रेम करतात हा भाग वेगळा असो,), त्यामुळे या करुणेपोटी ती आपल्या मुलांना आपल्यासोबत घेऊन जाते. मुलांना "सोबत" घेणे हे पाप आहे का ?? हा तिचा दोष आहे का ??
काही कारणाने तलाक होऊन जर मुले स्वतःसोबत असतील तर पुरुष माझ्या मुलांना सांभाळायचे ही अट घालतो.मग तरुणीसोबत लहान मुले असतील तर पुरुषांना ती लहान मुले सांभाळण्यात "अडचण" काय ???
आज माझा मुस्लिम तलाकशुदा ग्रुप हा विवाहाचा मोफत ग्रुप आहे. ज्याच्या माध्यमातून आत्तापर्यंत "शेकडो" मोफत विवाह झाले आहेत.परंतु तरुणीसोबत लहान मुले. नको ही अट बहुतांशी असल्याने माझ्या ग्रुप मध्ये किमान 300 मुलींचे विवाह "खोळंबलेले" आहेत. मुस्लिम समाजात हा अतिशय गंभीर विषय असून अजूनही बहुतांशी लोकांचे यावर लक्ष गेलेले दिसतं नाही. आज मुलींचे दिवसेंदिवस वय वाढत आहे, तरुणीची ही आर्तहाक कोण ऐकणार ?? आई - वडील जिवंत असेपर्यंत त्यांच्या घरात "आसरा" असतो त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी कुठे जायचे ?? आज दिवसेंदिवस हा "जटिल प्रश्न" त्यांना आज सतावत आहे.
पुरुषांनी "मन" मोठे करून, आपल्या आई - वडिलांना विश्वासात घेऊन विधवा - तलाकशुदा तरुणींशी त्यांच्या लहान मुलांसह विवाह करावा. आणि "पुण्य" आणि आशीर्वाद मिळवावे.
*इकबाल बाबासाहेब मुल्ला*
( *पत्रकार* )
संपादक - सांगली वेध
संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.
*मोबाईल - 8983587160*






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा