Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १० डिसेंबर, २०२५

तुळजापूर तालुक्यासाठी कार्डियक ॲम्बुलन्स साठी पालकमंत्र्यांकडे सादर केलेल्या अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याचे अमोल जाधव यांना पत्र

 *मुख्यसंपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी**

*मो:--  9730 867 448*



तुळजापूर तालुक्यासाठी कार्डियक अॅम्ब्युलन्स मंजुर करुन मिळणेबाबत. तुळजापूर तालुका शिवसेनाप्रमुख अमोल शिवाजीराव जाधव यांनी पालकमंत्री प्रताप राव सरनाईक यांच्याकडे निवेदन सादर केले होते त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव यांनी हा अर्ज नियमानुसार उचित कार्यवाही करून कार्यवाहीचा अहवाल पालकमंत्र्यांकडे सादर करून त्याची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याबाबत अमोल जाधव यांना पत्राद्वारे कळवले आहे

याबाबत सविस्तर वृत्त असे कि


 खाजगी सचिव मंत्री परिवहन महाराष्ट्र राज्य यांचे पृष्ठांकन जा.क्रं.२०३/जनरल/२५ दि.१६.१०.२०२५. यांना

अमोल शिवाजीराव जाधव रा. मंकावती गल्ली, तुळजापूर यांनी अर्ज 

सादर केला होता त्याचा पाठपुरावा करावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाने अमोल जाधव  कळवले आहे




उपरोक्त संदर्भीय विषयी तुळजापूर तालुक्यासाठी कार्डियक अॅम्ब्युलन्स मंजुर करुन मिळणेबाबत.  पालकमंत्री यांच पृष्ठांकान संदर्भ क्रं.२ अमोल शिवाजीराव जाधव रा. मंकावती गल्ली, तुळजापूर यांनी  पालकमंत्री महोदय यांचेकडे निवेदन सादर केले आहे. सदर निवेदन संदर्भ क्रं. २ नुसार या कार्यालयास प्राप्त झाले आहे सदर पत्राचा विषय आपल्या कार्यालयाशी संबंधित असल्याने सदर पत्र आपल्या कार्यालयाकडे पाठविण्यात येत आहे.

त्या करिता संदर्भ क्रं. १ व २ च्या अनुषंगाने प्राप्त झालेले निवेदन या समवेत जोडुन देण्यात आले असुन सदर निवेदनात नमुद वावींच्या अनुषंगाने आवश्यक ती नियमानुसार उचित कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल मा. पालकमंत्री महोदय यांच्या कार्यालयास सादर करुन त्याची एक प्रत या कार्यालयास सादर करावी. प्रकरणी विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी. असे हे पत्रात नमूद केले आहे

(स्वाती शेंडे)

उपजिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव.

प्रत- 1. मा.प्रालकमंत्री, मंत्री परिवहन महाराष्ट्र राज्य, मुंबई-४०००३२ यांना माहितीस्तव सादर अमोल शिवाजीराव जाधव रा. मंकावती गल्ली, तुळजापूर.

उपजिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा