Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ३० डिसेंबर, २०२५

*शालेय राष्ट्रीय कुराश स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंचा डंका, संघाने द्वितीय क्रमांकाचा चषक पटकावत १९ पदकांची केली लयलूट.*

 *सहसंपादक -डॉ. संदेश शहा (इंदापूर)*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-9922 419 159*



उत्तर प्रदेश मधील सहारनपूर येथे संपन्न झालेल्या शालेय राष्ट्रीय कुराश स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाने चमकदार कामगिरी करत ५ गोल्ड ५ सिल्वर व ९ ब्रांझ पदक अशी एकूण १९ पदकांची कमाई केली. शालेय राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाने आपला दबदबा मागील वर्षी प्रमाणेच यावर्षी देखील ठेवून सर्वांचे लक्ष वेधले. उत्तर प्रदेश मधील सहारनपूर येथे दिनांक १५ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत या राष्ट्रीय स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धांचे या  उत्तर प्रदेश सरकारने अत्यंत चांगल्या प्रकारे नियोजन केले होते. यावेळी शालेय विद्यार्थी खेळाडू, पंच तसेच अधिकारी यांची प्रशासनाने उत्तम व्यवस्था केली होती.        

                                                                                     सदर स्पर्धेसाठी कुराश असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष अंकुश नागर, महासचिव शिवाजी साळुंखे, पुणे क्रीडा अधिकारी शिवाजी कोळी, टेक्निकल ऑफिशियल म्हणून इंटरनॅशनल पंच  दत्तात्रय व्यवहारे, टीम मॅनेजर अँड इंटरनॅशनल पंच श्रुती पुनगावकर, इंटरनॅशनल पंच अमित भोसले, टीम मॅनेजर शरद अंदुरे, ओव्हरऑल इंटरनॅशनल कोच पंच अनिकेत व्यवहारे, संजय पाटील, आनंद गावडे, राकेश बोगा, महिला कोच जयश्री व्यवहारे, माया कदम यांनी अधिकृतपणे पंच म्हणून काम पाहिले. विजयी खेळाडू खालील प्रमाणे आहेत. गोल्ड मेडल १) अथर्व मोरे, २) अजिंक्य नरोटे, ३) वृंदा शेलार, ४) तनया पाटील, ५) वैदेही बाबर. सिल्वर मेडल्स १) आर्यन शेंडे,२) विश्वजीत पाटील, ३) प्रिन्स सोनवणे, ४ ) मनस्वी यादव,५) श्रावणी सावंत.


 ब्रांझ पदक १) आनवी गायकवाड, २) तेजस्विनी आसबे, ३) तृप्ती कोपनर, ४) ऋचा बोगा, ५) समीक्षा राऊत, ६ ) ऋतुजा पाटील, ७) सायली खरात, ८) आर्या शिंदे,

९) कार्तिक पाटील. उपरोक्त सर्व यशस्वी खेळाडूंचे इंदापूर नगरपरिषदेचे नूतन नगराध्यक्ष भरत शहा तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा