*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी**
*मो:-- 9730 867 448*
सदाशिवराव माने विद्यालय
प्राथमिक शाळा,अकलूज.चे
दि- २२,२३ व २४ डिसेंबर २०२५ रोजी वार्षिक स्नेहसंमेलन "जयोत्सव" २०२५ संपन्न झाले
दिनांक २२ डिसेंबर रोजी प्रमुख अतिथी सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील तथा दादासाहेब उपस्थित होते.तसेच प्रशाला समितीच्या सभापती, प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा कु.स्वरुपाराणी जयसिंह मोहिते-पाटील तथा दिदीसाहेब उपस्थित होत्या.तसेच शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक, प्रशाला समितीचे सदस्य,तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका कु. नुरजहां शेख मॅडम उपस्थित होत्या. उपस्थित सर्व मान्यवर अतिथींचे स्वागत आनंदयात्री बालवाद्यवृंदातील विद्यार्थी कलाकारांनी स्वागत गीतातून केले. तद्नंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका कु.शेख मॅडम यांनी केले.त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सहकार महर्षि काकासाहेब व आक्कासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व दीपप्रज्वलन करण्यात आले याप्रसंगी सहकार महर्षि काकासाहेबांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून महर्षि गीताने करण्यात आले.तद्नंतर आपल्या सर्वांचे लाडके माननीय दादासाहेब यांनी आपल्या मनोगतातून सर्व विद्यार्थी कलाकारांचे गोड कौतुक केले व सर्वांना शुभेच्छा दिल्या.त्यानंतर "आनंदयात्री बालवाद्यवृंद" कार्यक्रम संपन्न झाला."मेरा मुल्क मेरा देश" हे देशभक्तीपर गीत मा.दादासाहेब, मा.दिदीसाहेब तसेच उपस्थित सर्व पालक वर्ग सर्वांनी मोठ्या आवाजात ,उत्साहात व आनंदात हे गीत गायन केले.यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची गाणी उत्कृष्ठपणे सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.यावेळी समोर उपस्थित पालक वर्गाने ही विद्यार्थी कलाकारांना दाद दिली.
त्यानंतर इयत्ता ४ थी व १ ली मधील विद्यार्थ्यांनी समूह नृत्याचे सादरीकरण केले.यामध्ये डोंबारी गीत,संदेश गीत, देशभक्तीपर गीत,आदिवासी गीत,गवळण गीत,कोळी गीत असे विविध नृत्य प्रकारांचे उत्कृष्ठरित्या सादरीकरण केले.
दि.२३ डिसेंबर रोजी प्रमुख अतिथी .सुषमा महामुनी मॅडम (गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती,माळशिरस) उपस्थित होत्या.तसेच अकलूज केंद्राचे केंद्रप्रमुख .ननवरे सर उपस्थित होते.तसेच शिक्षण प्रसारक मंडळ,अकलूज चे संचालक बाळासाहेब सणस साहेब उपस्थित होते. तसेच प्रशाला समितीच्या सदस्या .कुलकर्णी वहिनी,जावळे वहिनी,.चांडोले वहिनी,.चव्हाण वहिनी उपस्थित होत्या.तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका कु.शेख मॅडम उपस्थित होत्या.प्रथमतःप्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सहकार महर्षि काकासाहेब व आक्कासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व दीपप्रज्वलन करण्यात आले.त्यानंतर सहकार महर्षि काकासाहेबांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करुन महर्षि गीत सादर झाले.त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.*
त्यानंतर इयत्ता ३ री व इयत्ता छोटा गट च्या विद्यार्थ्यांनी समूह नृत्याचे सादरीकरण केले.यामध्ये देशभक्तीपर गीत,बालगीत,शेतकरी गीत,धनगर गीत असे विविध नृत्य प्रकारांचे उत्कृष्ठरित्या सादरीकरण केले.
दिनांक - २४ डिसेंबर रोजी प्रमुख अतिथी मा.श्री.विशाल कदम साहेब (पोलीस उपनिरीक्षक) अकलूज पोलीस ठाणे,अकलूज उपस्थित होते.प्रथमतः उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सहकार महर्षि काकासाहेब व आक्कासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व दीपप्रज्वलन करण्यात आले याप्रसंगी सहकार महर्षि काकासाहेबांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन महर्षि गीताने करण्यात आले.त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवर अतिथींचे स्वागत आनंदयात्री बालवाद्यवृंदातील विद्यार्थी कलाकारांनी स्वागत गीतातून केले.त्यानंतर "आनंदयात्री बालवाद्यवृंद" कार्यक्रम संपन्न झाला.यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची बालगीते उत्कृष्ठपणे सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.यावेळी समोर उपस्थित पालक वर्गाने ही विद्यार्थी कलाकारांना दाद दिली.
त्यानंतर इयत्ता २ री व इयत्ता मोठा गट च्या विद्यार्थ्यांनी समूह नृत्याचे सादरीकरण केले.यामध्ये देशभक्तीपर गीत,बालगीत,शेतकरी गीत, शिक्षण गीत, आदिवासी गीत असे विविध नृत्य प्रकारांचे उत्कृष्ठरित्या सादरीकरण केले.त्यानंतर झालेल्या गीतांचे बक्षीस वितरण करण्यात आले.त्यामधून प्रथम,द्वितीय व तृतीय असे क्रमांक देण्यात आले.यावेळी तिन्ही दिवस समूहनृत्य सादरीकरणाचे परीक्षण करण्यासाठी परीक्षक म्हणून लाभलेले औदुंबर सूर्यकांत भिसे सर, धीरज गुरव सर,कु.प्रगती उरणे मॅडम,.महेश गाडेकर सर उपस्थित होते.
तिन्ही दिवस कार्यक्रमाचे सूत्रसंचालन. शकील मुलाणी सर व .मिसाळ सर यांनी केले व दररोज सारे जहाँ से अच्छा या समूहगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
दिनांक २२,२३ व २४ डिसेंबर २०२५ रोजी "जयोत्सव" वार्षिक स्नेहसंमेलन २०२५ मोठ्या उत्साहात व निर्विघ्नपणे पार पडले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पालक,विद्यार्थी,शिक्षक,शिक्षतेकर कर्मचारी सर्वांनी मोलाचे योगदान दिले. सदर कार्यक्रम प्रशालेच्या मुख्याध्यापिका कु.शेख मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली दिमाखात संपन्न झाला.









कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा