*कार्यकारी संपादक*
*एस.बी.तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
*मो:-8378081147
भिमा नदीवरील संगम ते शेवरे येथील प्रमुख रस्ता मेघा कंपनीने काँक्रिटीकरण करून द्यावा. तसेच संगम, वाफेगाव या ठिकाणी गतिरोधक बसवावेत या प्रमुख मागणीसाठी युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश दादा इंगळे यांनी आमरण उपोषण चालू केले आहे.
उपोषणास सोलापूर जिल्ह्याचे नेते डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. संगम शेवरे रस्ता अकलूज टेंभुर्णी या प्रमुख दळणवळणाचा रस्ता असून दररोज मोठ्या प्रमाणात ये जा केली जाते. तसेच मालवाहतूक व आपत्कालीन रुग्णवाहतूक केली जाते. तर अनेक साखर कारखान्यांचा ऊसाची वाहतूक केली जाते. रस्त्याचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रचंड मोठ मोठ्या खड्ड्यांचे साम्राज्यामुळे सामान्य माणसांना मणक्याचे तसेच धुळीमुळे शोषणाचे आजार होत आहेत.
जाहिरात 👇
सदरची बाब मेघा कंपनीला लक्षात आणून देवून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे युवा सेनेच्या वतीने युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे यांनी आमरण उपोषण चालू केले आहे. उपोषणास महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या अध्यक्ष विद्या साळुंखे यांनी पाठिंबा दिला आहे. यावेळी युवा सेना उपतालुका प्रमुख दत्ता साळुंखे, सचिन भोसले, गणेश भिताडे, पोपट जमदाडे, भारत सांगडे, भिमा भोई, सचिन इंगळे, नवनाथ इंगळे, विकास भोई, प्रशांत पराडे, ओम पराडे, दयानंद इंगळे, आदित्य इंगळे, भारत इंगळे, गणेश काळे, साधू शिंदे, बाळु इंगळे, बबन पराडे, निळू दळवी, सचिन लोकरे, आशोक देखने, राजेद्र इंगळे, यश भोसले आदि शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते. यावेळी अकलूज पोलिस स्टेशनच्या वतीने हवालदार स्वप्नील गायकवाड यांनी बंदोबस्त पुरविला आहे.
---------------------------





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा