Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ३१ डिसेंबर, २०२५

*शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन संपन्न*

 *अकलूज प्रतिनिधी*

 *केदार लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*



अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष  श्रमसंस्कार शिबिराचा उद्घाटन समारंभ आज चौंडेश्वरवाडी (ता.माळशिरस) या ठिकाणी संपन्न झाला.या शिबीराचे उद्घाटन महाविद्यालय विकास समितीचे सभापती व अकलूज नगरपरिषदेचे नूतन नगरसेवक सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे होते तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवप्रसाद टिळेकर हे उपस्थित  होते.



             यावेळी मार्गदर्शन करताना सयाजीराजे मोहिते-पाटील म्हणाले की,समाजाला दिशा देण्याची क्षमता ही युवकांच्या मध्येच आहे. वृक्षारोपणासारख्या विधायक उपक्रमांमधून पर्यावरण संतुलन साधण्यास मदत होईल.यावेळी विद्यार्थांना त्यांनी वृक्षारोपण उपक्रमासाठी दोन हजार रोपे देण्याचे जाहीर केले.युवकांनी परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून करावी मग देश बदलायला वेळ लागणार नाही असे मत पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे यांनी व्यक्त केले.   


                  ∆∆∆∆∆-जाहिरात-∆∆∆∆∆👇



          या उद्घाटन कार्यक्रमासाठी चौंडेश्वरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.अलका शिवाजीराव इंगवले-देशमुख,उपसरपंच प्रशांत मोहिते,ग्रामसेवक अशोक सावंत, विभागीय समन्वयक डॉ.अनिल लोंढे,मुख्याध्यापिका वंदना डोंगरे, डॉ.बाळासाहेब मुळीक,जुनियर विभागाचे  विभागाचे पर्यवेक्षक प्रा. अरविंद शेंडगे,प्रा.एकनाथ बोडके, प्रा.स्मिता पाटील डॉ.चंद्रशेखर ताटे, ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ स्वयंसेवक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ.दत्तात्रय मगर यांनी केले.डॉ.विजय शिंदे यांनी सूत्रसंचालन तर डॉ.सज्जन पवार यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा