Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ३० डिसेंबर, २०२५

युरिया विक्री कृषी खात्यामार्फत करावी!* *कृषी विक्रेत्यांना बळीचा बकरा करू नये!!* *जिल्हा खत विक्रेते असोशियन!!!*

 *करमाळा-- प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


सध्या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात युरियाचा प्रचंड तुटवडा आहे 

 खत कंपन्या  विक्रेत्यांना दहा युरिया टन देत असताना किमान 40 ते 50 हजार रुपयाची लिंकिंग खते बळजबरीने देतात 

 लिंकिंग घेतले नाही तर युरिया देत नाहीत 

 दुसरीकडे कृषी खाते खत कंपन्यांना लिंकिंग करण्यास आडकाठी आणत नाहीत या प्रकारात कृषी विक्रेते बळीचा बकरा होत असून 

 यापुढे सर्व युरिया कृषी खात्यामार्फत विक्री करावी अशी मागणी महाराष्ट्र खते बी बियाणे कीटकनाशके असोसिएशन राज्य उपाध्यक्ष महेश चिवटे यांनी केली आहे 

                   



 युरिया ऐवजी नॅनो युरिया चा वापर करा असे आव्हान केंद्र सरकारमार्फत व कृषी खात्यामार्फत केले जात आहेत 

 दोनशे पोते युरियाच्या पाठीमागे किमान पाच ते सात पेट्या नॅनो युरिया दोन पेट्या न्यानो dapसूक्ष्म अन्नद्रव्य 

 कीटकनाशके विक्रेत्यांना बळजबरीने कंपनी देतात 

 या कंपन्यांना व्यापारी विरोध करू शकत नाहीत 

 कंपन्यांचे लिंकिंग घेण्यास विरोध केला तर कंपन्या युरिया देत नाहीत व इतर सर्व खतांचा पुरवठा बंद करतात

 या लिंकिंग खताचे सुद्धा रोख पैसे विक्रेत्यांकडून कंपन्या वसूल करतात 

                    ‌‌.   -----: जाहिरात:-----👇



 यामुळे कृषी विक्रेते त्रस्त झाले आहेत 

 काही शेतकरी  वैयक्तिक वादातून  जाणीवपूर्वक व्यापाऱ्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने केवळ युरियाची प्रत्येकी दहा ते पंधरा पोत्याची मागणी करतात यामुळे कृषी विक्रेते व शेतकऱ्यांमध्ये वाद होत आहेत 

 भरमसाठ युरियाच्या वापरामुळे कॅन्सरचे प्रमाण वाढत असून या युरिया चा वापर बेकायदेशीरपणे पशुखाद्य व इतर केमिकल कंपन्या वापरत असल्यामुळे शासनाचे यावर युरियावर निर्बंध आहेत 

 266रुपये किमतीचे युरियाचे पोते केमिकल कंपन्या दीड हजार रुपये प्रति प्रमाणे खरेदी करत असल्यामुळे यामध्ये मोठ्या वेगाने काळाबाजार होत आहे 

 यावर सर्व प्रकारे बंधन आणण्यासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी येणारा सर्व युरिया तालुका कृषी कार्यालयामार्फत विक्री करावा

 जेणेकरून आवश्यक असलेल्या शेतकऱ्यांना युरिया मिळेल 

 कंपन्यांची मनमानी थांबेल लिंकिंग थांबेल 

 व शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणावर युरिया मिळेल

 या सर्व बाबींचा विचार करून युरिया खताची विक्री कृषी खात्यामार्फत करावी अशी मागणी कृषी विक्रेते असोसिएशनची राज्य उपाध्यक्ष महेश चिवटे

 यांनी केली आहे________________________

              *चौकट*

 युरिया खत उत्पादक कंपन्यांनी कोणतेही लिंकिंग न करता खत विक्रेत्यांना खतपुरवठा केला तर सर्व विक्रेते युरिया खताचा पुरवठा करतील अन्यथा 10 जानेवारी 2026 पासून सोलापूर जिल्ह्यातील खत विक्रेते कंपन्यांकडून खते खरेदी करणे बंद करतील असा इशारा खत विक्रेते असोसिएशन सोलापूर यांनी दिला आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा