Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ३१ डिसेंबर, २०२५

*महापुरुषांचे जीवन अनुकरणीय व प्रेरणादायी -प्रशांत सरुडकर*

 *अकलूज प्रतिनिधी*

 *केदार लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


महापुरुषांचे जीवन हे अनुकरणीय व प्रेरणादायी आहे.आदर्श जीवन जगण्याची मूल्ये महापुरुषांच्या चरित्रात सापडतात.वाचन,मनन आणि चिंतन संस्कारातून महामहापुरुष आपणाला समजतात. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या प्रेरणा घेऊन आपले जीवन उज्वल करावे.असे प्रतिपादन इतिहासाचे अभ्यासक प्रशांत सरुडकर यांनी केले.

                चौंडेश्वरवाडी तालुका माळशिरस येथे शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख प्रा.दत्तात्रय मगर होते.राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून चौंडेश्वरवाडी येथे विविध उपक्रम राबवले जात आहेत. ग्रामस्वच्छता,वृक्षारोपण,सांडपाणी व्यवस्थापन,महिला मेळावा,मतदार जागृती या विविध विषयांवर कृतीयुक्त व प्रबोधनात्मक उपक्रम आयोजित केलेले आहेत. 




           यावेळी बोलताना प्रशांत सरुडकर यांनी इतिहासातील जीवनमूल्ये रुजवण्याबाबत मार्गदर्शन केले.छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर देशाचा स्वातंत्र्यलढा व सामाजिक समतेच्या लढ्यातील महापुरुषांची जीवन वैशिष्ट्ये आणि त्यांनी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला.महापुरुष जर समजावून घ्यायचे असतील तर वाचन संस्कृती रुजणे अतिशय महत्त्वाचे आहे.वाचनाची आवड जोपासली पाहिजे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर,अभ्यास मनन आणि चिंतनातून मोठे झाले.अभ्यासातूनच महात्मा ज्योतिराव फुले,सावित्रीबाई फुले यांना शिक्षण ज्योत प्रज्वलित करण्याची प्रेरणा मिळाली.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी यांचे प्रयत्नातून ज्ञानाचे मळे फुलवले. विद्यार्थ्यांनी मोबाईल मधून लक्ष बाजूला काढून पुस्तकाची साथ स्वीकारायला हवी आहे.                                   


                        ∆∆∆:--जाहिरात :--∆∆∆∆👇


 पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही. वाचन संस्काराच्या आधारे महापुरुष आपणाला समजतात आणि आपल्याला भविष्याची आणि आदर्श जीवन जगण्याची प्रेरणा देतात.यातूनच विद्यार्थ्यांनी स्वतःचे भविष्य उज्वल करावे,ज्ञानसाधना करावी.प्रा.मगर यांनी विद्यार्थ्यांनी समाजसेवेला महत्व द्यावे. अभ्यासाच्या माध्यमातून ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करावा.आपले स्वतःचे जीवन संस्कारशील बनवावे, असे आवाहन केले.यावेळी प्रा. सज्जन पवार,प्रा.विजयकुमार शिंदे, प्रा.भारत जाधवर,प्रा.एकनाथ बोडके,प्रा.स्मिता पाटील,तानाजी बावळे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा