*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी**
*मो:-- 9730 867 448*
मराठा सेवा संघाच्या माढा तालुका सचिवपदी सहाय्यक अभियंता सुरज मोहिते यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांनी या पुर्वी मराठा सेवा संघाचे तालुका उपाध्यक्ष म्हणून चांगले काम केले आहे. मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष निलेश देशमुख यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले. जिजाऊ रथयात्रेचे यशस्वी नियोजन करण्यात अभियंता सुरज मोहिते यांचे मोलाचे योगदान लक्षात घेऊन त्यांची मराठा सेवा संघाच्या तालुका सचिव पदी निवड करण्यात आल्याचे तालुकाध्यक्ष निलेश देशमुख यांनी सांगितले. त्यांच्या या निवडीबद्दल मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अमित निमकर, जिल्हा सचिव धनाजी मस्के, जिल्हा उपाध्यक्ष मनोज पवार, संभाजी ब्रिगेडचे राज्य संघटक मनोज गायकवाड, यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना अभियंता सुरज मोहिते यांनी युगपुरुष अॅड. पुरूषोत्तमजी खेडेकर साहेबांनी स्थापन केलेल्या मराठा सेवा संघाच्या विचारधारेला अनुसरून सामाजिक कार्य करणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी कार्यकारी अभियंता राकेश मगर, मराठा सेवा संघाचे जिल्हा सह कोषाध्यक्ष नागेश व्यवहारे उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा