*करमाळा-- प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
करमाळा तालुक्यातील पाथुर्डी येथील टीव्ही नाईन चे युवा पत्रकार तसेच करमाळा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे तालुका उपाध्यक्ष शितलकुमार मोटे यांचा नुकताच बीड जिल्ह्यातील आष्टी येथे राज्यस्तरीय पुरस्कार देऊन त्यांचा नुकताच सन्मान करण्यात आला आहे
Tv 9 मराठीचे पत्रकार शितलकुमार मोटे यांनी अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झालेले कव्हरेज करून शेतकऱ्यांच्या व्यथा शासनदरबारी पोहोचविण्याचे काम केल्याबद्दल गंगाई बाबाजी राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.अजित पवार गटाचे नेते माजी आमदार भीमराव धोंडे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आष्टी येथे हा पुरस्कार देण्यात आला.
∆∆∆∆ जाहीरात∆∆∆👇
पत्रकार मोटे हे गेली 15 वर्षांपासून अधिक काळापासून पत्रकारिता क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करीत आहे त्यांनी आजपर्यंत आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्न मार्गी लावल्या असून करमाळा तालुक्या मधून विशेषता ग्रामीण भागामधून प्रथमताच त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे करमाळा तालुका पत्रकार संघ तसेच डिजिटल मीडिया पत्रकार संघटने च्या वतीने अभिनंदन केले जात आहे





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा