*करमाळा प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत पाटील गटाकडून नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक काही दिवसावर येऊन ठेपली असल्याने विद्यमान आमदार नारायण आबा पाटील गटाकडूनही या निवडणुकीबाबत तयारी सुरू झाली आहे. याबाबत अधिक सविस्तर बोलताना आमदार पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर यांनी सांगितले की करमाळा तालुक्यातील जनतेने विधानसभा व आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत करमाळा तालूक्यातुन विक्रमी मतदान दिले आहे.
यामुळे आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही मायबाप मतदार केवळ विकासाच्या मुद्द्यावर ठाम राहून आमदार नारायण आबा पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील. तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकी प्रमाणे नवीन व कोऱ्या पाटीच्या उमेदवारांनाही संधी दिली जाणार आहे. आमदार नारायण आबा पाटील यांनी आजवर सर्वच समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळवून देण्याचे काम केले आहे. सर्वांना बरोबर घेऊन सामाजिक समतोल जपण्याचे काम याही निवडणुकीत केले जाईल. आमदार नारायण आबा पाटील गटात प्रवेश करण्यासाठी अनेकजण इच्छुक असुन निवडणुक काळात इन कमिंगवर भर देऊन विकासाच्या मुद्द्यावर सहमत होऊन जर कोणी आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनतेची सेवा करु इच्छित असेल तर त्यांचे पाटील गटात निश्चितच स्वागत असणार आहे.
****जाहिरात******👇
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकी बाबत युती आघाडीचा निर्णय घेण्याचे अधिकार हे सर्वस्वी आमदार नारायण आबा पाटील यांना असून तुर्तास जिल्हा परिषदेच्या सर्व गटात व पंचायत समितीच्या सर्व गणात होतकरु व समाजासाठी वेळ देणाऱ्या कार्यकर्त्यांची मते जाणून शक्य तेथे संधी देण्याच्या विचारात पाटील गट आहे. या दृष्टीने संभाव्य उमेदवारांच्या नावांवर चर्चा सुरु आहे. या निवडणुकीत कोणा बरोबर आघाडी करावयाची, कोणत्या पक्षाच्या चिन्हावर निवडणुक लढवायची की अपक्ष लढायचे यावर अजून निर्णय झालेला नसुन करमाळा मतदार संघातील एक प्रमुख राजकीय गट म्हणुन पुर्ण ताकदीने आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीत उतरण्याची तयारी पाटील गटाने सुरू केली असल्याचे प्रवक्ते सुनिल तळेकर यांनी सांगितले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा