Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १० डिसेंबर, २०२५

शिक्षणाची साथ,संकटावर मात ॲड.फरहीन खान- पटेल

 उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्युज मराठी


जिल्हा परिषद धाराशिव एकात्मिक बाल विकास सेवा योजना ग्रामीण प्रकल्प उमरगा जिल्हा धाराशिवच्या वतीने किशोरवयीन मुलींना व महिलांना जेंडर आरोग्य कुटुंब नियोजन कायदेविषयक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.२१ नोव्हें.ते २८ नोव्हें.२०२५ पर्यंत विभाग मुळज, विभाग गुंजोटी ( कसगी),विभाग बलसुर (कलदेव निंबाळा) विभाग तुरोरी, विभाग डिग्गी या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्यावेळी मूळज व बलसुर विभागाचे सुपरवायझर माने मॅडम, डिग्गी व कसगी विभागाचे सुपरवायझर कांबळे मॅडम,व तुरोरी विभागाचे सुपरवायझर कुलकर्णी मॅडम, सर्व आशा कार्यकर्ती सेविका व किशोरवयीन मुलीं मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.   

 कार्यक्रमात कलदेव निंबाळाचे उपसरपंच सुनीता पावशेरे,बिराजदार सर (महात्मा गांधी विद्यालय डिग्गी) चंद्रशेखर बदोले सर,पाटील मॅडम,माशाळे सर, (सिद्धेश्वर विद्यालय कसगी) तसेच आरोग्य संबंधी मार्गदर्शन करण्यास आरोग्य तज्ञ उपस्थित होत्या. त्यावेळी किशोरवयीन मुलींना ॲड.फरहीन खान पटेल यांनी कायदेविषयक मार्गदर्शन करतांना पोक्सो कायदा,बालविवाह प्रतिबंध कायदा,कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा,महिलांना समानतेचा हक्क व अधिकार याबद्दल मार्गदर्शन केले. त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनात किशोरवयीन मुलींना शिक्षणाची साथ तर संकटावर मात करता येणार असे प्रतिपादन करून त्याबद्दल सविस्तर माहिती दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा