उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
माळीनगर
येथील दि सासवड माळी शुगर फॅक्टरी व माळीनगर बॅडमिंटन क्लब यांच्यावतीने दि.७ डिसेंबर रोजी माळीनगर साखर कारखान्याच्या गेस्ट हाऊस येथील बॅडमिंटन कोर्ट मध्ये आयोजात करण्यात आलेल्या दुहेरी पुरुष बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.
या स्पर्धेचे उद्घाटन माळशिरसचे गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी माळीनगर साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र गिरमे,मॅनेजिंग डायरेक्टर गणेश इनामके,व्हा.चेअरमन निखिल कुदळे,संचालक विशाल जाधव, म.फुले पतसंस्थेचे व्हा.चेअरमन महादेवराव एकतपुरे, संचालक जयवंत चौरे, माळीनगर मल्टीस्टेटचे चेअरमन अमोल गिरमे, जैविक इंडस्ट्रीजचे चेअरमन रणजीत बोरावके, माजी जिल्हाधिकारीआनंद पाटील, मृणाल ट्रेडर्सचे प्रोप्रायटर जयदीप बोरावके, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रिंकू राऊत, उपप्राचार्य रितेश पांढरे, शिवदास खताळ,हर्षद होनप, शिवकांत कणगी,नाना बंडगर,विराज गिरमे,चंद्रकांत काळे,पोपट गोफणे,महादेव बंडगर,माळीनगर बॅडमिंटन क्लबचे खेळाडू सदस्य आदी उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी जयदीप बोरावके (रु.२१०००),म. फुले पतसंस्था (रु.१५०००), निलेश एकतपुरे व शिवदास खताळ (प्रत्येकी रु.५०००), सुनील शिंदे,हर्षद होनप,राजेश पोटे(प्रत्येकी रु.३०००),डॉ. फारुख शेख,किसन कानतोडे(प्रत्येकी रु.२०००), जयप्रकाश कांबळे,दिलीप इनामके(प्रत्येकी रु.१०००) यांनी याप्रमाणे बक्षिसे दिलेली आहेत. या स्पर्धेसाठी पंच म्हणून अजिक्य जाधव(अकलूज) व बाजीगर शेख(माळीनगर)यांनी काम पाहिले.
स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे-गट १) खुला-गणेश सपकाळ व तेजस खोमणे, बारामती (प्रथम), सलील मनेरी व तनिष्क केंजळे बारामती (द्वितीय); २)वयोगट 35 पुढील-नितीन गाढवे व राकेश पेठारे फलटण (प्रथम), जितेंद्र चौंडाज व अभिनंदन नांद्रे,सांगली (द्वितीय); ३)वयोगट ४५ पुढील- विनायक भुवन व शशांक सावंत, कोल्हापूर (प्रथम), पोपट गोफणे व नानासाहेब काटे,माळीनगर (द्वितीय).
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी माळीनगर बॅडमिंटन क्लबच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा