*अकलूज ---प्रतिनिधी*
*एहसान मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
नवी दिल्ली : मनरेगाचं नाव बदललं गेलं आहे ज्यानंतर काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय नाव बदललं गेल्यानंतर जो वाद होतो आहे ती बाब अत्यंत दुर्दैवी आहे असंही शशी थरुर यांनी म्हटलं आहे. ग्राम स्वराज्य आणि राम राज्य या दोन्ही संकल्पना एकमेकांच्या विरोधी नाहीत. महात्मा गांधींनी या दोन्हीसाठी सहमती दर्शवली होती. राम राज्याचा शब्द त्यांच्या लेखांमध्येही असे असं म्हणत शशी थरुर यांनी मनरेगाचं नाव बदलल्यानंतर नाराजी व्यक्त करत म्हटलं आहे.श
शशी थरुर यांनी नेमकं काय म्हटलं आहे?
शशी थरुर म्हणाले, ग्रामीण भागातील गरीबांसाठी महात्मा गांधींचा दृष्टीकोन हा अतिशय स्वच्छ होता. त्यांना सगळ्या गरीब जनतेची काळजी होती. तसंच त्यांना रामाप्रति आस्था होती. त्यांनी प्राण सोडतानाही रामाचं नाव घेतलं होतं. त्यांचा वारसा आपण जपला पाहिजे त्याचा अपमान करता कामा नये. आता विभाजनाची अशी रेष आखू नका असंही शशी थरुर यांनी म्हटलं आहे. मागच्या २० वर्षांपासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना असं नाव होतं. आता त्यांचं नाव बदलण्याचं कारण काय? तुम्ही योजनेतल्या अटी-शर्थी बदलू शकता. तो सरकारचा अधिकार आहे हे आम्हाला मान्य आहे. पण मनरेगाचं नाव बदलणं आवश्यक नाही.
के.सी. वेणुगोपाल यांनीही केली टीका
काँग्रेसचे नेते के. सी वेणुगोपाल यांनीही महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचं नाव बदललं जाण्याच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. सरकारप्रमाणे ज्यांची विचारधारा आहे त्यांनी महात्मा गांधींची हत्या केली आणि सरकार त्यांचे विचार मानू पाहतं आहे. नाव बदलण्यामागे दुसरं काय कारण असू शकतं? महात्मा गांधीचं नाव बदलण्यासाठी नियमबाह्य पद्धतीने विधेयक मंजूर करण्यात आलं. लोकशाहीच्या इतक्या मोठ्या मंदिरात स्वतःचा कोता अजेंडा राबवण्यासाठी विधेयकाचा उपयोग रबरी शिक्क्यासारखा केला जातो आहे अशीही टीका वेणुगोपाल यांनी केली.
१२ डिसेंबरला काय घडलं?
संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच १२ डिसेंबरला केंद्रीय कॅबिनेटची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये काँग्रेस प्रणित युपीए सरकारनं २००५ मध्ये आणलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अधिनियम या कायद्याचं नाव बदललं आहे. याचं नाव आता 'पुज्य बापू ग्रामीण रोजगार हमी योजना' असं असणार आहे. नाव बदलण्याबरोबरच या योजनेत काही महत्वाचे बदलही सरकारनं केले आहेत. त्यानुसार, सरकारनं रोजगार हमी देणारे दिवस वाढवले असून ते १२४ दिवस करण्यात आले आहेत. तसंच मानधनातही वाढ करण्यात आली असून ते आता २४० रुपये दिवसाला इतकं असणार आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा