पत्रकार--डी .एस . गायकवाड
डॅशिंग लीडर म्हणून खासदार धैर्यशील मोहिते पाटील सर्वपरिचित आहेत.आपली काम करण्याची पद्धत देखील त्यांनी धडाडीने दाखवून दिली आहे.संसदीय अधिवेशनात विविध विषयांना हात घालत अनेक प्रश्न देशासमोर आणून मतदारसंघाला न्याय देताना ते दिसत आहे. पाठीमागील प्रस्तावांचा पाठपुरावा करताना नवीन विषयांना हात घालत त्या सोडवण्याच्या दृष्टीने त्यांचा कसोशीने प्रयत्न सुरू असल्याचे दिसते...
विविध मंत्रांच्या गाठीभेटी घेत अनेक प्रश्नांचा ते निपटारा करताना दिसत आहेत.. यातच त्यांनी भाजपाचे मास लीडर असणारे केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि महाराष्ट्राचा आत्मा असलेल्या सहकार विषयावर सखोल चर्चा केली. सहकारातील बारकावे, अडचणी आणि भविष्यातील सहकार वाढवण्याची रणनीती त्यांनी अमित शहा यांचे समोर व्यक्त केली यावर पुढून सकारात्मक प्रतिसाद देखील आला.
पण या निमित्ताने काही जणांच्या बुडाखालची वाळू मात्र सरकल्याचे स्पष्टपणे दिसते आहे.
निवडणुकात आपण केलेली विकास कामे दाखवणे आणि तदनंतर लगेच विकास कामासाठी तत्पर राहणे आणि त्यासाठी अखंडितपणे प्रयत्न करणे ही खासियत मोहिते पाटील घराण्याची राहिली आहे.
याचाच प्रत्यय, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, युवा नेते शिवतेजसिंह मोहिते पाटील, सयाजीराजे मोहिते पाटील यांचे कडून येत आहे....
टीकाकारांनी भरपूर टीका केल्या... पण त्यांच्या टीकांना भीक न घालता समाजाप्रती असणारी आपली बांधिलकी मोहिते पाटील कुटुंब अविरतपणे जपताना दिसत आहे.
माझीच लाल म्हणणारे अनेक भाजपात उगवले आहेत.. त्यांना या अमीत शहांच्या भेटीच्या निमित्ताने खूप मोठी चपराक बसली आहे..
रियल धुरंधर खा.धैर्यशील मोहिते पाटील ठरले आहेत...जन कल्याणाच्या विकासासाठी काय पण करण्याची तयारी त्यांनी नुकतीच दर्शवली होती.. त्यामुळे त्यांचे डॅशिंग नेतृत्व माढा मतदार संघाला भूषणावह ठरताना दिसत आहे...
आपली राजकीय प्रगल्भता त्यांनी दाखवून दिली आहे.. त्यांच्यात असणारी माढा मतदारसंघासाठीच्या विकास कामांची तळमळ त्यांच्या कृतीतून स्पष्ट होताना दिसत आहे.
अमीत शहांच्या भेटीने त्यांनी खूप मोठी चपराक विरोधकांना मारली आहे.ऐन थंडीत विरोधकांना यामुळे आणखी हुडहुडी भरली असेल...हे मात्र नक्की...
डी.एस.गायकवाड..




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा