Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २० डिसेंबर, २०२५

*दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या इस्टीमेट साठी सुरुवात : आमदार नारायण (आबा) पाटील*

 *करमाळा-- प्रतिनिधी* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी*



दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या इस्टीमेट साठी सुरुवात झाली असुन महावितरण कडून प्रकल्पाबाबत माहिती घेण्यास सुरुवात झाली असल्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले. करमाळा तालुक्यातील पुर्व भागासाठी वरदायीनी ठरलेला दहिगाव उपसा सिंचन प्रकल्प हा सौर उर्जेवर चालवावा हि मागणी आमदार नारायण आबा पाटील यांनी अनेक वर्ष झाली सातत्याने लावून धरली होती. याबाबत अधिक सविस्तर माहिती देताना आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले की दहिगाव उपसा सिंचन योजना चालू केल्यानंतर या योजनेच्या आवर्तन काळातील लाईट बिलाचा प्रश्न हा भविष्यात शेतकऱ्यांना आर्थिक फटका देणारा ठरु शकतो हे लक्षात आल्यावर आपण हि योजना सौर उर्जेवर चालवावी अशी मागणी सर्वप्रथम केली. वास्तविक पाहता दहिगाव उपसा सिंचन योजनेचे सर्वाधिक सहा इलेक्ट्रिक पंप असलेले पंप हाऊस हे दहिगाव येथे आहे.                                     

       ‌‌.                   ‌‌---; जाहिरात:-+


      यामुळे उजनी बॅक वॉटर पृष्ठभागावर सौर ऊर्जा प्रकल्प उभा करता येईल ही व जागेचा प्रश्न उरणार नाही हि माझी संकल्पना मी सन २०१४ ते २०१९ या माझ्या आमदार पदाच्या पहिल्या टर्म मध्ये विधानसभेत मांडली. या कामाचा प्रत्येक अधिवेशनात पाठपुरावा सुध्दा केला. मध्यंतरी शासनाने सर्व उपसा सिंचन योजना ह्या सौर उर्जेवर चालवण्याचा निर्णय घेतला व सहाजिकच माझ्या मागणीस पृष्टी मिळाली. यामुळे आता भविष्यात हि योजना सौर उर्जेवर चालणार हे निश्चित झाले आहे. मागील वीज बिल दरानुसार या योजनेचे सर्व दहा पंप अविरतपणे चालू राहिले तर प्रति दिन दोन लक्ष रुपये वीज बिल येते. यामुळे हा प्रकल्प सौर उर्जेवर चालवल्यास शेतकऱ्यांना केवळ पाणीपट्टी भरावी लागणार आहे. महावितरणच्या प्रकाशगड (मुंबई) येथील कार्यालयात वरिष्ठ अधिकारी ए सी यादव यांचेकडे या योजनेचे अंदाजपत्रक तयार करण्याची जबाबदारी सोपवली असुन त्यांनी हि योजना वर्षभरात किती दिवस चालते व एकंदरीत किती वीज खर्ची पडते याचा तपशील गोळा करण्यास सुरुवात केली असल्याने लवकरच अंदाजपत्रक अर्थात इस्टीमेट तयार होईल व पुढील कामास आणखी गती येईल. आपण स्वतः या योजनेवर बारकाईने लक्ष ठेऊन आहोत व यासाठी आपला पाठपुरावा चालू असल्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा